Bigg Boss 16 | त्या भांडणानंतर ‘साजिद खान’विरोधात सोशल मीडियावर सहानुभूतीची लाट

इतकेच नाही तर या भांडणामध्ये अर्चनाने थेट साजिद खानचा बाप काढला.

Bigg Boss 16 | त्या भांडणानंतर साजिद खानविरोधात सोशल मीडियावर सहानुभूतीची लाट
| Updated on: Nov 24, 2022 | 7:06 PM

मुंबई : बिग बाॅस 16 च्या कालच्या एपिसोडमध्ये साजिद खान आणि अर्चना गाैतम यांच्यामध्ये जोरदार भांडणे झाली. इतकेच नाही तर या भांडणामध्ये अर्चनाने थेट साजिद खानचा बाप काढला. आतापर्यंतच्या भांडणामध्ये अर्चना साजिद खानला नेहमीच मोठ्या घरातील असल्याचे म्हणत होती. परंतू प्रत्येकवेळी साजिद खानने अर्चनाला सांगितले की, माझे बालपण हे झोपडपट्टीमध्ये गेले आहे. अर्चनाला टास्क कोणताही असो कोणीतरी भांडणासाठी पाहिजे असते.

टास्क दरम्यान साजिद खानचा टार्गेट करत अर्चना अनेक गोष्टी बोलते. परंतू दरवेळी अर्चनाच्या बोलण्याकडे साजिद खान लक्ष देत नाही. परंतू साजिद खानचा थेट बाप अर्चना काढते आणि घरामध्ये मोठा गोंधळ निर्माण होतो.

शिव ठाकरे आणि शालिन साजिद खानला रूममध्ये घेऊन जातात. मात्र, तरीही अर्चना अनेक गोष्टी साजिद खानला बोलते. मग साजिद खानचा पारा चढतो आणि ते पण अर्चनाला अनेक गोष्टी सुनावतात.

अर्चनासोबत झालेल्या भांडणानंतर साजिद खान भावनिक होतो आणि लहानपणीच्या वडिलांसोबत असलेल्या आठवणींना उजाळा देतो. वडिलांचे निधन कसे झाले आणि त्यावेळी नेमके काय घडले होते, हे सर्व साजिद खान शिव ठाकरे, एमसी आणि अब्दूला सांगतो.

वाईट काळात सलमान खानच्या वडिलांनी आपल्याला कशाप्रकारे मदत केली हे देखील साजिद खान सांगतो. हे सर्व काही सांगताना साजिद खान खूप जास्त भावूक झाल्याचे बघायला मिळाले. यावेळी शिव ठाकरे आणि एमसी साजिदला आवरण्याचा प्रयत्न करतात.

कालच्या एपिसोडमध्ये साजिद खानचे हे रूप पाहिल्यानंतर युजर्सने साजिद खानला पाठिंबा दर्शवला आहे. इतकेच नाही तर अनेकांनी म्हटले की, अर्चनासाठी तुम्ही स्वत: ला इतका जास्त त्रास नका करून घेऊ.

साजिद खान बिग बाॅसच्या घरात दाखल झाल्यानंतर अनेकांनी विरोध दर्शवला होता. इतकेच नाही तर साजिद खानला बिग बाॅसच्या घराबाहेर काढण्यासाठी सोशल मीडियावर एक मोहिम राबवण्यात आली होती.