Bigg Boss 16 | शालिन भनोट याच्या हातून मोठी चुक, टीना होणार बेघर?

या दोघींपैकी एकजण बिग बाॅसच्या घराबाहेर जाणार आहे.

Bigg Boss 16 | शालिन भनोट याच्या हातून मोठी चुक, टीना होणार बेघर?
| Updated on: Dec 10, 2022 | 6:41 PM

मुंबई : बिग बाॅसने शालिन भनोट याला धर्म संकटामध्ये टाकले आहे. निम्रत काैर, एमसी, सुंबुल आणि टीना हे या आठवड्यामध्ये नाॅमिनेशनमध्ये आहेत. नुकताच एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यामध्ये दिसत आहे की, एमसी आणि निम्रत हे दोघे या आठवड्यामुळे सुरक्षित झाले आहेत. मात्र, बेघर होण्यासाठी सुंबुल आणि टीना यांचे नाव आहेत. या दोघींपैकी एकजण बिग बाॅसच्या घराबाहेर जाणार आहे. आता या दोघींना सुरक्षित ठेवण्यासाठी बिग बाॅस शालिन भनोट याला मोठा अधिकार देतात.

सलमान खान शालिन भनोटला म्हणतो की, हे बजर दाबले तर टीना आणि सुंबुल या दोघीपण या आठवड्यामध्ये नाॅमिनेशनपासून सुरक्षित होतील. परंतू यासाठी प्राईज मनीमधून तब्बल 25 लाख रूपये जातील.

सलमान खान शालिन भनोट याला विचार करण्यासाठी जास्त टाईम देत नाही. यामुळे शालिनला काय करावे हे कळत नाही. कारण यापूर्वी प्राईज मनीमधून शालिनमुळे अगोदरच 25 लाख रूपये गेले आहेत.

शालिनला वाटते की, टीना दत्ता ही एक फेमस स्टार आहे. यामुळे ती नक्कीच बिग बाॅसच्या घराबाहेर जाणार नाही. सुंबुल आणि शालिन यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत खटके उडताना दिसत आहेत.

शालिन भनोट याला वाटते की, सुंबुल बेघर होईल. यामुळे शालिन बजर दाबत नाही. परंतू एक चर्चा सातत्याने सुरू आहे की, बिग बाॅसच्या घराबाहेर टीना दत्ता ही पडली आहे.