AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss Marathi 3 | ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरात होणार नव्या वाईल्ड कार्ड पाहुण्याची एण्ट्री, पाहा कोण आहे हा अभिनेता?

आता शिवलीलाची रिती जागा भरायला एक नवा वाईल्ड कार्ड पाहुणा ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरात एण्ट्री करणार आहे. अर्थात उर्वरित 14 सदस्यांसाठी हे खास सरप्राईज असणार आहे. शनिवारच्या ‘बिग बॉस चावडी’ स्पेशल भागात तो या शोमध्ये आणि घरात एण्ट्री करेल.

Bigg Boss Marathi 3 | ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरात होणार नव्या वाईल्ड कार्ड पाहुण्याची एण्ट्री, पाहा कोण आहे हा अभिनेता?
Bigg Boss marathi 3
| Edited By: | Updated on: Oct 09, 2021 | 3:38 PM
Share

मुंबई : ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाची (Bigg Boss Marathi 3) जोरदार सुरुवात झाली आहे. आता घरातील स्पर्धक एकमेकांसोबत खऱ्याअर्थाने स्पर्धा करायला सुरुवात करत आहे. मराठी मनोरंजन विश्वातील 15 चर्चित नाव या घरात नांदत होती. विशाल निकम, उत्कर्ष शिंदे, संतोष चौधरी, विकास पाटील, अविष्कार दारव्हेकर, मीरा जगन्नाथ, मीनल शाह, तृप्ती देसाई, गायत्री दातार, स्नेहा वाघ, जय दुधाने, सुरेखा कुडची, शिवलीला पाटील, सोनाली पाटील, अक्षय वाघमारे यांनी यंदा घरात प्रवेश केला आहे. मात्र, आठवडाभारतच आता शिवलीला बाहेर पडली आहे. आजारी असल्याकारणाने तिने या शोमधून माघार घेतली होती.

मात्र, आता शिवलीलाची रिती जागा भरायला एक नवा वाईल्ड कार्ड पाहुणा ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरात एण्ट्री करणार आहे. अर्थात उर्वरित 14 सदस्यांसाठी हे खास सरप्राईज असणार आहे. शनिवारच्या ‘बिग बॉस चावडी’ स्पेशल भागात तो या शोमध्ये आणि घरात एण्ट्री करेल. हा स्पर्धक असणार आहे अभिनेता आदिश वैद्य.

पाहा व्हिडीओ :

कोण आहे आदिश वैद्य?

आदिश वैद्य मराठी टीव्ही इंडस्ट्रीमधील खूप लोकप्रिय नाव आहेत. त्याने ‘रात्रीस खेळ चाले सीझन 1’, ‘कुंकू टिकली आणि टॅटू’, ‘जिंदगी नॉट आऊट’ सारख्या प्रसिद्ध शोमध्ये काम केले आहे. ‘सेक्स वेब ड्रग्स आणि थिएटर’ या मराठी वेब सीरिजमध्येही त्यांनी काम केले आहे. सध्या तो ‘गुम है किसी की प्यार मे’ या हिंदी मालिकेत दिसत होता. मात्र, नुकतीच त्याने ही मालिका सोडली आहे.

स्नेहाने सांगितली आपबिती

स्नेहा वाघ हिंदी टीव्हीची एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने इमॅजिन टीव्हीच्या शो ‘ज्योती’ मधून प्रेक्षकांवर छाप पाडली. या मालिकेत ती मुख्य भूमिकेत होती. यानंतर तिने ‘चंद्रगुप्त मौर्य’ या मालिकेत ‘मुरा’ची भूमिका साकारली आणि नंतर ती ‘वीरा’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसली होती. नुकतीच तिने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आपली आपबिती सांगितली.

तो मला खूप मारायचा…

स्नेहाचे पहिले लग्न अविष्कर दारवेकर यांच्याशी झाले होते. त्यावेळी ती फक्त 19 वर्षांची होती. पहिल्या लग्नात तिला शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागले, असे स्नेहा सांगते. त्यानंतर तिने पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला. यावेळी आपली आपबिती सांगताना स्नेहा म्हणाली की, ‘एक वेळ अशी होती की, मला घरी जायची देखील भीती वाटायची.. शूटवर जाताना देखील माझी अर्धी शुद्ध हरपलेली असायची. अशावेळी सेटवरचे लोक मला खूप सांभाळून घायायचे. अनेकदा शूट करतानासुद्धा मला मारहाण झालेल्या खुणा सर्वांना दिसायच्या…’

आता काही करू दे…

स्नेहा म्हणते, आता तो कसाही असला तरी त्याने काही फरक पडत नाही. मी त्याने केलेल्या गोष्टी कधीही विसरू शकत नाही. त्यावेळी मी आई-वडिलांकडे पळून जायचे, घाबरायचे.. मात्र, आता मी ती स्नेहा नाही. आता स्नेह बदलली आहे. त कोणालाही आणि कशालाही घाबरत नाही. त्यामुळे आता काही झालं तरी मी लढायला समर्थ आहे. स्नेहा ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरात सुरेखा कुडुची यांना ही आपबिती सांगत होती.

हेही वाचा :

‘Squid Game’ तब्बल 10 वर्ष करावा लागला होता नकाराचा सामना, आता ठरतेय सर्वाधिक लोकप्रिय सीरीज!

आर्यनच्या अटकेमुळे शाहरुख खानला कोट्यवधींचा फटका, ‘या’ ब्रँडने तोडला व्यावसायिक करार

मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....