AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘Squid Game’ तब्बल 10 वर्ष करावा लागला होता नकाराचा सामना, आता ठरतेय सर्वाधिक लोकप्रिय सीरीज!

आपण जर सीरीज प्रेमी असाल, तर नवीन नेटफ्लिक्स शो ‘स्क्विड गेम’बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. तोच शो त्याबद्दल बोलताना कंटाळा येत नाही आणि ज्यांच्या बक्षिसाची रक्कम प्रत्येकाने भारतीय चलनात बदलून पाहिली आहे की, हा खेळ जिंकला, तर किती कोटी मिळवले असते.

‘Squid Game’ तब्बल 10 वर्ष करावा लागला होता नकाराचा सामना, आता ठरतेय सर्वाधिक लोकप्रिय सीरीज!
Squid Game
| Edited By: | Updated on: Oct 09, 2021 | 2:20 PM
Share

मुंबई : आपण जर सीरीज प्रेमी असाल, तर नवीन नेटफ्लिक्स शो ‘स्क्विड गेम’बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. तोच शो त्याबद्दल बोलताना कंटाळा येत नाही आणि ज्यांच्या बक्षिसाची रक्कम प्रत्येकाने भारतीय चलनात बदलून पाहिली आहे की, हा खेळ जिंकला, तर किती कोटी मिळवले असते. ज्या शोमध्ये एक विचित्र मोठी बाहुली त्याच्या फोटोत उभी दिसते, आता आठवले का?

‘स्क्विड गेम’ काय आहे हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. कोरियन दिग्दर्शक ह्वांग डोंग-ह्युक यांनी हा शो तयार केला आणि लिहिला देखील आहे. ‘स्क्विड गेम’ ही असहाय लोकांची नऊ भागांची कथा आहे, ज्यांनी एक गूढ खेळ खेळून मोठी बक्षीस रक्कम जिंकण्याचे ठरवले आहे. सर्व वयोगटातील 456 लोकांना शोमध्ये हा गेम खेळण्यासाठी आमंत्रित केले आहे. या गेमच्या विजेत्याला 45.6 अब्ज दक्षिण कोरियन वॉन (KRW) म्हणजेच 2,86,11,08, 360 रुपयांचे बक्षीस मिळेल. खेळताना लोकांचे जीव धोक्यात येतात आणि काहीजण आपला जीवही गमावतात.

लोकांचा ओरडण्याचा आणि त्यांचे प्राण वाचवण्याचा हा खेळ बघण्यात प्रेक्षकांना खूप मजा येत आहे. एवढेच नाही, तर नेटफ्लिक्सचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि आणि यशस्वी शो म्हणूनही पाहिला जात आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, की दिग्दर्शक ह्वांग डोंग-ह्युकचा शो तब्बल 10 वर्षे नाकारला गेला आहे?

10 वर्षे नाकारला गेला शो!

प्रत्येक चांगली गोष्ट आधी नाकारली जाते, ही प्रथाच आहे असे म्हणूया. ‘स्क्विड गेम’ सध्या जागतिक स्तरावर हिट झाला आहे. पण हा यशाचा रस्ता ह्वांग या दिग्दर्शकासाठी खूप कठीण होता. ह्वांगला या मालिकेची कल्पना लोकांसमोर आणण्यात खूप अडचण आली, कारण प्रत्येकाला ती अवास्तव वाटली होती.

आर्थिक तंगीमुळे लॅपटॉप विकावा लागला!

वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, ह्वांग डोंग-ह्युकला या शोची कल्पना एका दशकाहून अधिक काळापूर्वी काळापूर्वी सुचली होती. त्यावेळी तो त्याच्या आई आणि आजीबरोबर राहत होता. एक वेळ अशी आली, जेव्हा ह्वांगकडे पैसे नव्हते, म्हणून त्याला लिखाण थांबवून त्याचा लॅपटॉप देखील विकावा लागला. त्या वेळी, अभिनेत्यांना आणि गुंतवणूकदारांना या शोमध्ये पैशाच्या लढाईसाठी लोकांची अत्यंत वाईट स्थितीत राहण्याची आणि मरण्याची कल्पना आवडली नव्हती.

नेटफ्लिक्सने दिली संधी!

मग, ह्वांगच्या आयुष्यात नेटफ्लिक्सची एन्ट्री झाली. नेटफ्लिक्सने दोन वर्षांपूर्वी विचार केला की, स्क्विड गेम हा क्लास रिअॅलिटी शो आहे. नेटफ्लिक्सचा विचार चुकीचा नव्हता, असेच आता म्हटले पाहिजे. 2010 मध्ये प्राणघातक खेळ आणि आणि क्लास कॉमेंट्री शो आणि चित्रपट याकडे तितकेसे गांभीर्याने पाहिले जात नव्हते.

स्क्विड गेम 17 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. त्याची लोकप्रियता पाहून असे म्हटले पाहिजे की नेटफ्लिक्सने तो प्रदर्शित करण्यासाठी योग्य वेळ निवडली आहे. दिग्दर्शक ह्वांगच्या आर्थिक अडचणींमुळे हा शो आणखी विश्वासार्ह बनण्यास मदत झाली आहे. आता लोक ‘स्क्विड गेम’च्या सीझन 2 ची वाट पाहत आहेत.

हेही वाचा :

आर्यनच्या अटकेमुळे शाहरुख खानला कोट्यवधींचा फटका, ‘या’ ब्रँडने तोडला व्यावसायिक करार

The Kapil Sharma Show : ‘या’ कारणामुळे कपिल शर्मावर रागवला सैफ आली खान, शक्ती कपूरशी होते नाराजीचे कनेक्शन!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.