AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आर्यनच्या अटकेमुळे शाहरुख खानला कोट्यवधींचा फटका, ‘या’ ब्रँडने तोडला व्यावसायिक करार

गेल्या काही दिवसांपासून BYJU's ब्रँडने आगाऊ पैसे भरल्यानंतरही शाहरुख खानच्या जाहिराती बंद करण्याची घोषणा केल्याचे वृत्त आहे. हा शाहरुख खानकडे असलेला सर्वात मोठा प्रोजेक्ट असल्याचे समजते. | Shahrukh khan

आर्यनच्या अटकेमुळे शाहरुख खानला कोट्यवधींचा फटका, 'या' ब्रँडने तोडला व्यावसायिक करार
शाहरुख खान
| Edited By: | Updated on: Oct 09, 2021 | 1:18 PM
Share

नवी दिल्ली: ड्रग्ज पार्टी प्रकरणात अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) आर्यन खानला ताब्यात घेतल्यामुळे अभिनेता शाहरुख खानला मोठा व्यावसायिक फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. आर्यनच्या अटकेनंतर आता एका मोठ्या ब्रँडने शाहरुखसोबतचे नाते संपवल्याचे वृत्त आहे. गेल्या काही दिवसांपासून BYJU’s ब्रँडने आगाऊ पैसे भरल्यानंतरही शाहरुख खानच्या जाहिराती बंद करण्याची घोषणा केल्याचे वृत्त आहे. हा शाहरुख खानकडे असलेला सर्वात मोठा प्रोजेक्ट असल्याचे समजते.

‘इकॉनॉमिक टाईम्स’च्या माहितीनुसार, एडटेक स्टार्टअपने आगाऊ बुकिंग असूनही शाहरुख खानच्या जाहिराती मागे घेतल्या आहेत. काही दिवसांपासून ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बऱ्याच ट्रोलचा सामना करावा लागत आहे. ‘बायजू’च्या प्रवक्त्याने यासंदर्भात प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

किती कोटींचा करार?

शाहरुख खानचा ‘बायजू’सोबतचा करार 3-4 कोटी रुपयांच्या वार्षिक शुल्कावर निश्चित करण्यात आला आहे. शाहरुख खान 2017 पासून कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. मात्र, आर्यन खानच्या अटकेनंतर सोशल मीडियावर अनेकजण शाहरुख खानने आपल्या मुलालाच नीट शिकवले नाही, तो इतरांना काय सल्ले देतो, अशी खोचक टीका केली जात होती. याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता ‘बायजू’ने शाहरुख खानसोबतचा करार तोडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे आता शाहरुख खानला नक्की किती कोटींचे नुकसान होणार, हे पाहावे लागेल.

‘आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात गोवण्यात आलेय’

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला आहे. दिल्लीपासून महाराष्ट्रातील नेत्यांपर्यंत भाजपच्या नेत्यांनी फोन करुन रिषभ सचदेवा, आमीर फर्निचरवाला, प्रतिक गाभा यांना सोडण्याचे आदेश दिल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. तसेच युवा मोर्चाचा अध्यक्ष मोहित कुंबोज आता मोहित भारतीय म्हणून नाव आता लावतात. त्यांचे भाजपच्या बड्या नेत्यांसोबत संबंध आहेत. मोहित कंबोजचे मेहुणे रिषभ सचदेवा यांना एनसीबीने ताब्यात घेतलं होतं. त्यांना सोडवण्यासाठी सचदेवाचे वडील, काका आणि स्वत: कुंभोजही गेले होते. त्यानंतर सचदेवांना सोडून देण्यात आलं, असा खळबळजनक दावाही मलिक यांनी केला आहे.

वानखेडेंची कॉल डिटेल्स घ्या

आमची मुंबई पोलिसांकडे मागणी आहे, चौकशी करा, समीर वानखेडेंची कॉल डिटेल घ्या, ज्चा तिघांना सोडण्यात आलं, वडील आणि काका हे एनसीबी ऑफिसमध्ये गेले याबाबत शंका आहे, समीर वानखेडेंसोबत भाजपच्या नेत्यांचं बोलणं झालं आणि त्यानंतर सोडण्यात आलं हे कॉल डिटेलमध्ये समोर येईल, अशी मागणीही त्यांनी केली.

संबंधित बातम्या:

NCB नं ड्रग्ज पार्टीतून तीन लोकांना सोडलं? मलिकांनी तिन नावं फोडली, भाजप कनेक्शनचा गौप्यस्फोट

कोण आहेत गाबा, फर्निचरवाला जे राष्ट्रवादीच्या टार्गेटवर आहेत, ज्यांनी आर्यनखानला पार्टीत नेल्याचा आरोप आहे?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.