कोण आहेत गाबा, फर्निचरवाला जे राष्ट्रवादीच्या टार्गेटवर आहेत, ज्यांनी आर्यनखानला पार्टीत नेल्याचा आरोप आहे?

क्रूझवरील पार्टीत ड्रग्ज नव्हतंच. तसेच मनिष भानुशाली हा भाजपचा पदाधिकारी क्रूझवर पोहोचला कसा? असे बॉम्बगोळे टाकून एनसीबीला अडचणीत आणल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी नवा बॉम्ब टाकला आहे.

कोण आहेत गाबा, फर्निचरवाला जे राष्ट्रवादीच्या टार्गेटवर आहेत, ज्यांनी आर्यनखानला पार्टीत नेल्याचा आरोप आहे?
नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई: क्रूझवरील पार्टीत ड्रग्ज नव्हतंच. तसेच मनिष भानुशाली हा भाजपचा पदाधिकारी क्रूझवर पोहोचला कसा? असे बॉम्बगोळे टाकून एनसीबीला अडचणीत आणल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी नवा बॉम्ब टाकला आहे. दिल्लीपासून महाराष्ट्रातील नेत्यांपर्यंत भाजपच्या नेत्यांनी फोन करुन रिषभ सचदेवा, आमिर फर्निचरवाला, प्रतिक गाभा यांना सोडण्याचे आदेश दिल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीच्या रडारवर आलेले गाबा, फर्निचरवाला कोण आहेत? याचा घेतलेला हा आढावा.

नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला आहे. दिल्लीपासून महाराष्ट्रातील नेत्यांपर्यंत भाजपच्या नेत्यांनी फोन करुन रिषभ सचदेवा, आमीर फर्निचरवाला, प्रतिक गाभा यांना सोडण्याचे आदेश दिल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. तसेच युवा मोर्चाचा अध्यक्ष मोहित कुंबोज आता मोहित भारतीय म्हणून नाव आता लावतात. त्यांचे भाजपच्या बड्या नेत्यांसोबत संबंध आहेत. मोहित कंबोजचे मेहुणे रिषभ सचदेवा यांना एनसीबीने ताब्यात घेतलं होतं. त्यांना सोडवण्यासाठी सचदेवाचे वडील, काका आणि स्वत: कुंभोजही गेले होते. त्यानंतर सचदेवांना सोडून देण्यात आलं, असा खळबळजनक दावाही मलिक यांनी केला आहे.

कोण आहेत प्रतिक गाबा, फर्निचरवाला

प्रतिक गाबा हा क्रूझवरील पार्टीचा को-ऑर्डिनेटर होता. त्यानेच आर्यन खानला पार्टीसाठी निमंत्रित केलं होतं. आर्यनने तशी माहितीच दिललेली आहे. तसेच आमिर फर्निचरवाला यांनीही आर्यनला पार्टीसाठी आमंत्रित केलं होतं. या दोघांचाही या पार्टीच्या आयोजनात सहभाग असल्याचं सांगितलं जातं.

गाबा, फर्निचरवालाचा कोर्टात उल्लेख

प्रतिक गाभा आणि आमीर फर्निचरवाला यांची नावं कोर्टात उल्लेख करण्यात आला. या दोघांच्या बोलावण्यावरुन आर्यन खान तिकडे गेले होते. 1300 लोकांच्या जहाजावर रेड टाकली, रात्री 12 तास रेड टाकण्यात आली, त्यापैकी 11 लोकांना ताब्यात घेतलं, या सर्वांना एनसीबीच्या कार्यालयात आणण्यात आलं. त्यानंतर तीन जणांना सोडण्यात आलं, ते कुणाच्या आदेशावरुन हे एनसीबीने सांगावं, असा सवाल मलिक यांनी केला आहे.

वानखेडेंची कॉल डिटेल्स घ्या

आमची मुंबई पोलिसांकडे मागणी आहे, चौकशी करा, समीर वानखेडेंची कॉल डिटेल घ्या, ज्चा तिघांना सोडण्यात आलं, वडील आणि काका हे एनसीबी ऑफिसमध्ये गेले याबाबत शंका आहे, समीर वानखेडेंसोबत भाजपच्या नेत्यांचं बोलणं झालं आणि त्यानंतर सोडण्यात आलं हे कॉल डिटेलमध्ये समोर येईल, अशी मागणीही त्यांनी केली.

 

संबंधित बातम्या:

NCB नं ड्रग्ज पार्टीतून तीन लोकांना सोडलं? मलिकांनी तिन नावं फोडली, भाजप कनेक्शनचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी, शिवसेना, आर्यन खानच्या पाठिशी? मलिकांनंतर आता अरविंद सावंत यांची ‘मुंबईची बात’

अजित पवारांशी संबंधित कंपन्यावर आयकर विभागाच्या धाडी; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील पहिल्यांदाच म्हणाले…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI