AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवारांशी संबंधित कंपन्यावर आयकर विभागाच्या धाडी; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील पहिल्यांदाच म्हणाले…

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर धाडी मारण्यात आल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून आयकर विभागाने हे धाडसत्रं सुरू केलं आहे. (dilip walse patil first reaction on raids on ajit pawar related company)

अजित पवारांशी संबंधित कंपन्यावर आयकर विभागाच्या धाडी; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील पहिल्यांदाच म्हणाले...
दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री
| Edited By: | Updated on: Oct 09, 2021 | 11:57 AM
Share

पिंपरी-चिंचवड: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर धाडी मारण्यात आल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून आयकर विभागाने हे धाडसत्रं सुरू केलं आहे. त्यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एखाद्या व्यक्तीच्या घरी चौकशी करणं ठिक, पण नातेवाईकांच्या घरी जाणं हे काही बरोबर नाही, असं दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटलं आहे.

दिलीप वळसे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केंद्र सरकार त्यांच्याकडे असलेल्या एजन्सी आणि सत्तेचा वापर राजकीय कारणासाठी करत आहेत. या पूर्वीच्या काळात राजकारणात कधीही अशी परिस्थिती पाहिली नव्हती. एखाद्याच्या घरी चौकशी करणं ठीक आहे. परंतु सगळ्या नातेवाईकांच्या घरी जाणं आणि त्यांना त्रास देणं हे बरं नाही, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

अजितदादांच्या तीन बहिणींच्या घरी छापेमारी

अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरी आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या कारखान्यावर सलग तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून छापेमारी सुरु आहे. अजित पवारांच्या 3 बहिणींमध्ये कोल्हापुरातील विजया पाटील, तर पुण्यातील नीता पाटील आणि रजनी इंदूलकर यांचा समावेश आहे.

अहमदनगर

सलग तिसऱ्या दिवशी अजित पवार यांच्या अंबालिका शुगर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आयकर विभागाचे पथक दाखल झालं. इथेही तीन दिवसांपासून आयकर विभागाकडून तपासणी सुरू आहे.

दौंड (पुणे)

तिसऱ्या दिवशीही ‘दौंड शुगर’ या साखर कारखान्यावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनाकडून तपासणी सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे आयकर विभागाकडून कसून तपासणी.

पुणे

अजित पवारांच्या बहिणी डॉ. रजनी इंदुलकर यांच्यासह नीता पाटील यांच्या घरीही सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. मोदीबागेत नीता पाटील यांचे घर आहे. याच इमारतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील राहतात.

अजित पवारांशी संबंधित कारखान्यांवरही धाडसत्र

अजित पवारांच्या 3 बहिणींबरोबरच, 4 साखर कारखान्यांतील कागदपत्रांची छाननी आयकर विभागाकडून केली जातेय. यात साताऱ्यातला जरंडेश्वर साखर कारखाना, नंदुरबारमधला पुष्पदंतेश्वर साखर कारखाना, अहमदनगरमधला अंबालिका, तर पुण्यातील दौंड शुगर साखर कारखान्याचा समावेश आहे. आयकर विभागाची पहिली नजर अजित पवारांशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्यावरच पडली. सलग दुसऱ्या दिवशी आयकरच्या अधिकाऱ्यांकडून जरंडेश्वर कारखान्यात कारवाई सुरु आहे.

अजित पवार औरंगाबाद दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री अजित पवार आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. सायंकाळी चार वाजता ते औरंगाबादेत दाखल होतील. अजित पवार एक दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर असतील. ते विभागीय आयुक्त कार्यालयात अतिवृष्टीच्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. शेतकऱ्यांना मदत देण्याच्या दृष्टीने अतिवृष्टीच्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात जवळपास दीड तास आढावा बैठकीचं नियोजन आहे.

संबंधित बातम्या:

आर्यन खाननं पार्टीत ड्रग्ज घेतलं होतं की नाही? लाखमोलाच्या सवालाचं NCB च्या पंचनाम्यात उत्तर

Maharashtra News LIVE Update | औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर रोडवर ट्रकला भीषण आग, संपूर्ण ट्रक जळून खाक

Ajit Pawar IT Raids : अजित पवार, पाहुणे, बहिणी आणि साखर कारखान्यांच्या व्यवहाराचं गौडबंगाल, नेमकं काय आहे? वाचा सविस्तर

(dilip walse patil first reaction on raids on ajit pawar related company)

Follow Us
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर
हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच अभिजीत दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट?दावा...
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट? दिल्लीतील हालचालीमागे... बड्या व्यक्तीच्या दाव्याने खळबळ
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात घडामोडींना वेग