आर्यन खाननं पार्टीत ड्रग्ज घेतलं होतं की नाही? लाखमोलाच्या सवालाचं NCB च्या पंचनाम्यात उत्तर

एनसीबी अधिकाऱ्यांनी अरबाज मर्चंटला विचारलं की तुझ्याकडे ड्रग्स आहे का? तेव्हा त्याने सांगितलं की त्याने आपल्या बुटात ड्रग्स लपवलं आहे. एनसीबी अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर अरबाजने आपल्या बुटातून एक ZIP LOCK पाऊच काढलं, त्यात चरस होतं.

आर्यन खाननं पार्टीत ड्रग्ज घेतलं होतं की नाही? लाखमोलाच्या सवालाचं NCB च्या पंचनाम्यात उत्तर
आर्यन खान
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 10:41 AM

मुंबई : मुंबई ड्रग्स प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अन्य आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व आरोपींची रवानगी सध्या आर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आर्यन खानने ड्रग्स घेतलं होतं की नाही? असा सवाल केला जात आहे. दरम्यान, एनसीबी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यन खान हा चरसचं सेवन करतो. त्याचा मित्र अरबाज मर्चंट हा 6 ग्राम चरस आपल्या बुटात लपवून क्रुझवर घेऊन जात होता! (Aryan Khan was taking drugs, In front of the shocking information in the NCB’s panchnama)

मुंबईच्या समुद्रात 2 ऑक्टोबर रोजी एका लग्झरी क्रुझवर एनसीबीने छापेमारी केली होती. त्या ड्रग्स पार्टीशी संबंधित महत्वाची माहिती आता समोर येतेय. क्रुझवर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले त्यावेळी अरबाज मर्चंटची कसून चौकशी करण्यात आली. एनसीबी अधिकाऱ्यांनी अरबाज मर्चंटला विचारलं की तुझ्याकडे ड्रग्स आहे का? तेव्हा त्याने सांगितलं की त्याने आपल्या बुटात ड्रग्स लपवलं आहे. एनसीबी अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर अरबाजने आपल्या बुटातून एक ZIP LOCK पाऊच काढलं, त्यात चरस होतं.

एनसीबीच्या पंचनाम्यात धक्कादायक खुलासा

अरबाज मर्चंटने हे मान्य केलं आहे की तो आर्यन खानसोबत चरस घेत होता. ते क्रुझवर मजामस्ती करण्यासाठीच जात होते. जेव्हा एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यन खानला विचारलं तेव्हा त्याने हे स्वीकार केलं तो चरस घेतो. तसंच हे चरस क्रुझवर स्मोकिंगसाठी नेण्यात येत होतं. कॉरडेलिया क्रुझ ड्रग्स प्रकरणातील छापेमारीवेळी एनसीबीने केलेल्या पंचनाम्यात हे नमूद करण्यात आलं आहे.

आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला

दरम्यान, काल किल्ला कोर्टानं आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आर्यन खानला अजून किमान दोन रात्री तरी तुरुंगातच काढाव्या लागण्याची शक्यता आहे. शुक्रवारी आर्यन खान याच्या जामीन अर्जावर कोर्टात प्रचंड युक्तीवाद रंगला. पण अखेर कोर्टाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतला. पण किल्ला कोर्टात जामीन अर्ज दाखल करता येऊ शकत नाही या मुद्द्यावर बोट ठेवून कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

वकिलांचं पुढचं पाऊल काय असणार?

शुक्रवारी किल्ला कोर्टानं जामीन अर्ज फेटाळ्यानंतर आता आर्यन खानच्या वकिलांकडून सेशन्स कोर्टात जामीनासाठी अर्ज केला जाण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी काही कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोर्टाच्या आदेशाची कॉपी मिळाल्यानंतरच आर्यन खानचे वकील सेशन्स कोर्टात जामिनासाठी अर्ज करु शकणार आहेत. मात्र, या प्रक्रियेला एक किंवा दोन दिवस लागण्याची शक्यता वकिलांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

इतर बातम्या :

Ajit Pawar IT raid : अजित पवारांसह बहिणींच्या कार्यालयांवर सलग तिसऱ्या दिवशीही आयकर छापे

Sindhudurg Chipi Airport : सगळं सेम टू सेम, पोस्टर, बॅनर, माहिती, फक्त या नेत्याच्या फोटोऐवजी त्या नेत्याचा फोटो

Aryan Khan was taking drugs, In front of the shocking information in the NCB’s panchnama

Non Stop LIVE Update
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.