AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादी, शिवसेना, आर्यन खानच्या पाठिशी? मलिकांनंतर आता अरविंद सावंत यांची ‘मुंबईची बात’

क्रूझवरील ड्रग्स पार्टीप्रकरणाचा भांडाफोड करून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीच्या अडचणी वाढवल्या आहेत. क्रूझवर ड्रग्जच आढळलं नसल्याचं सांगत मलिक यांनी आर्यन खान यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला आहे. (Shivsena Leader Arvind Sawant attacked NCB Over Aryan khan Drugs case)

राष्ट्रवादी, शिवसेना, आर्यन खानच्या पाठिशी? मलिकांनंतर आता अरविंद सावंत यांची 'मुंबईची बात'
arvind sawant
| Edited By: | Updated on: Oct 09, 2021 | 12:26 PM
Share

मुंबई: क्रूझवरील ड्रग्स पार्टीप्रकरणाचा भांडाफोड करून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीच्या अडचणी वाढवल्या आहेत. क्रूझवर ड्रग्जच आढळलं नसल्याचं सांगत मलिक यांनी आर्यन खान यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेनेही आर्यनची बाजू उचलून धरत मुंबईची बात केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसेनाही आर्यनच्या पाठिशी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी एनसीबीच्या कारवाईवरून जोरदार टीका केली आहे. सीबीआय, ईडी, आयकर या तपास यंत्रणा देशात कोणतेही काम करत नाही. देशात यांच्या कारवाया होत नाही. केवळ महाराष्ट्रातच सर्व भ्रष्ट माणसं आहेत अशा पद्धतीनेच या कारवाया सुरू आहेत. यामागे मुंबईसह महाराष्ट्राला आणि बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, असा हल्लाबोल अरविंद सावंत यांनी केला आहे. यापूर्वीही शिवसेना नेते संजय राऊत यांनी आर्यन याच्यावरील कारवाईवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं.

पदामुळे सुक्ष्म नाव आलं

यावेळी अरविंद सावंत यांनी केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनाही टोले लगावले. चिपी विमानतळाच्या कार्यक्रम पत्रिकेवर आपलं नाव बारीक अक्षरात छापण्यात आल्याचं सांगत राणेंनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर, राणेंचं पद सुक्ष्म आहे. त्यामुळे त्यांचं नाव सुक्ष्म अक्षरात छापल्याचा टोला सावंत यांनी लगावला आहे.

शाहरुखच्या मुलाची केस एवढी महत्त्वाची आहे का?

दरम्यान, एनसीबीच्या कारवाईवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी यापूर्वीच केंद्र सरकारला धारेवर धरले होते. एनसीबीच्या कारवाईवरून शिवसेनेने भाजपला घेरलं आहे. शेतकऱ्यांच्या हत्या, शेतकऱ्यांचे रक्त यापेक्षा श्रीमंतांच्या पोरांची अमली पदार्थांची व्यसने आणि थेरं कुणाला महत्त्वाची वाटत असतील तर ‘जय जवान, जय किसान’चे नारे कशासाठी द्यायचे? बंद करा ती थेरं!, शाहरुख खानच्या मुलाची केस तुम्हाला एवढीच महत्त्वाची वाटते का?, अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी तोफ डागली होती.

राऊत नेमकं काय म्हणाले?

शेतकरी आंदोलन करीत असताना केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने भरधाव गाडी शेतकऱ्यांच्या आंदोलनात घुसवून शेतकऱ्यांना ठार केले. त्यामुळे आंदोलक भडकले व हिंसाचार झाला. इतके मोठे मृत्युकांड होऊनही देशातला मीडिया शाहरुख खानच्या मुलाने 13 ग्रॅम ड्रग्ज घेतल्याच्या बातम्यांचा पाठलाग करीत आहे. उत्तर प्रदेशात मंत्रीपुत्राने चार शेतकरी चिरडून मारले, यापेक्षा शाहरुख खानच्या पोराचे प्रताप या मंडळींना महत्त्वाचे वाटतात. शाहरुख खानचा मुलगा व त्याच्या नशेबाज मित्रमंडळींचे कृत्य हा श्रीमंतांचा माज आहे. त्यांच्यावर कायद्याने कठोरात कठोर कारवाई होईलच, पण शाहरुख पुत्राच्या कृत्याचे ढोल बडविताना मीडियाने उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या निर्घृण हत्यांवर जणू पडदाच टाकण्याचा प्रयत्न केला. लखीमपूर खेरीतील शेतकऱ्यांच्या हत्यांनी देश हादरला आहे, असा संताप राऊत यांनी व्यक्त केला होता.

संबंधित बातम्या:

आर्यन खाननं पार्टीत ड्रग्ज घेतलं होतं की नाही? लाखमोलाच्या सवालाचं NCB च्या पंचनाम्यात उत्तर

“बाळासाहेबांचा मुलगा आमच्या राणे साहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी येत आहे”

Ajit Pawar IT raid : अजित पवारांसह बहिणींच्या कार्यालयांवर सलग तिसऱ्या दिवशीही आयकर छापे

(Shivsena Leader Arvind Sawant attacked NCB Over Aryan khan Drugs case)

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.