Bigg Boss 16 | बिग बॉसने सुंबुल आणि मान्याला दिली मोठी शिक्षा…

इतकेच नाही तर या भांडणादरम्यान गोरीच्या अंगावर पाणी देखील फेकण्यात आले. बिग बॉसच्या घरात सध्या गटातटाचे राजकारण सुरू आहे.

Bigg Boss 16 | बिग बॉसने सुंबुल आणि मान्याला दिली मोठी शिक्षा...
| Updated on: Oct 19, 2022 | 8:26 AM

मुंबई : बिग बॉस 16 (Bigg Boss 16) ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. बिग बॉसच्या घरात सध्या गटातटाचे राजकारण सुरू आहे. अर्चना गौतम आणि गोरी नागोरी यांच्यामध्ये घरात जोरदार हंगामा झाल्याचे बघायला मिळाले. इतकेच नाही तर या भांडणादरम्यान अर्चनाच्या अंगावर पाणी (Water) देखील फेकण्यात आले. हा सर्व हंगामा बिग बॉसच्या घरात सुरू असताना मजेशीर गोष्ट म्हणजे सर्वांचा आवडता अब्दू डान्स करताना दिसला. अर्चना आणि गोरीच्या भांडणाचा व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतोय.

इथे पाहा गोरी आणि अर्चनाच्या भांडणाचा व्हिडीओ

गोरीने अर्चनावर आरोप केला होता की, तिने अॅव्होकॅडो फेकून दिले. याचविषयावर दोघींनी तूफान भांडणे केली. नेहमीप्रमाणे या भांडण्यात काही देणे घेणे नसताना प्रियंकाने उडी घेतली. मग हा वाद वाढतच गेला. बिग बॉसने घरातील सर्व सदस्यांना सांगितले की घरातील दोन सदस्यांची नावे सांगा, ज्यांचे योगदान शोमध्ये अत्यंत कमी राहिले आहे. यादरम्यान घरातील जास्त सदस्यांनी सुंबुल आणि मान्याचे नाव घेतले.

इथे पाहा बिग बाॅसने दिलेल्या शिक्षेचा व्हिडीओ

टीना दत्ता आणि शालिन यांनीही सुंबुलचे नाव घेतल्याने सुंबुलला आर्श्चयाचा मोठा धक्काच बसला. शोमध्ये योगदान कमी देणाऱ्या सदस्याला बिग बॉसने काळ्या रंगाची मंकी कॅप घालण्याची शिक्षा सुनावली. यामुळे मान्या आणि सुंबुलला काळ्या रंगाची कॅप घालावी लागली. घरातील सर्व सदस्यांचा निर्णय ऐकून मान्या आणि सुंबुल नाराज झाल्या. टीना आणि शालिनने आपले नाव घेतल्याने सुंबुलला आपले अश्रू रोखणे कठीण झाले होते.