Aryan Khan | आर्यन खानच्या तपासात अनेक चुका, ‘NCB’ अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

विभागीय चौकशीमध्ये काही गडबड जर आढळून आली तर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे.

Aryan Khan | आर्यन खानच्या तपासात अनेक चुका, 'NCB' अधिकाऱ्यांवर होणार कारवाई
Follow us
| Updated on: Oct 19, 2022 | 7:33 AM

मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील (Drug case) तपासात NCB कडून खूप मोठ्या चुका झाल्याचे आढळले आहे. आता या प्रकरणी NCB च्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे सांगितले जातंय. काही अधिकाऱ्यांनी आर्यन खानला (Aryan Khan) वाचवण्यासाठी जाणून बुजून तपास चुकीच्या पध्दतीने केल्याचे सांगितले जातंय. इतकेच नाही तर NCB कडून याचा एक सविस्तर अहवाल देखील तयार करण्यात आला असून यामध्ये त्या अधिकाऱ्यांची नावे देखील आहेत. हा अहवात दिल्लीला पाठवण्यात आलाय. या तपासातील अधिकारी (Officer) अन्य एजन्सीमध्ये गेले असले तरीही त्यांच्यावर कारवाई होणार हे नक्कीच आहे.

विभागीय चौकशीमध्ये काही गडबड जर आढळून आली तर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे. इतकेच नाही तर एखाद्या अधिकाऱ्याने चाैकशीदरम्यान गंभीर चूक केली असेल तर त्याला नारळ देत सेवेतून काढून टाकण्याची शिफारस केले जाणार आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात NCB च्या दक्षता पथकाला तपासात आठ अधिकाऱ्यांनी गंभीर चुका केल्याचे आढळून आले आहे. आता या अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई होणार हे जवळपास नक्की आहे.

तपासादरम्यान, पथकाने 65 साक्षीदार तपासले आणि त्यांचे जबाब नोंदवले. या सर्व साक्षीदारांचे जबाब कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आले आहेत. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर एनसीबीने 2 ऑक्टोबर 2021 रोजी अचानक छापा टाकला होता. यादरम्यान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अटक करण्यात आली. ड्रग्स केसमध्ये आर्यन खानचे नाव आल्याने अनेकांना मोठा धक्काच बसला होता. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि मुलगी सुहाना खान लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.