Raju Srivastav | राजू श्रीवास्तव अजूनही व्हेंटिलेटरवर, डॉक्टरांनी दिली अत्यंत महत्वाची माहिती…

| Updated on: Sep 15, 2022 | 9:29 AM

राजू श्रीवास्तव यांना रूग्णालयात दाखल करून एक महिन्याचा काळ उलटला आहे. राजू अजूनही व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण राजू यांना आतापर्यंत शुद्ध यायला हवी होती, असे डाॅक्टरांचे म्हणणे आहे.

Raju Srivastav | राजू श्रीवास्तव अजूनही व्हेंटिलेटरवर, डॉक्टरांनी दिली अत्यंत महत्वाची माहिती...
Follow us on

मुंबई : कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांच्यावर गेल्या एक महिन्यांपेक्षाही अधिक काळापासून दिल्लीतील रूग्णालयात उपचार सुरू आहे. राजू यांच्या तब्येतीबाबत दररोज अपडेट मिळते आहे. रूग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आल्यापासून राजू यांना अजून एक वेळही शुद्ध झाली नाहीये. यामुळे कुटुंबीय आणि चाहते चिंतेत आहेत. राजू यांच्या चांगल्या आरोग्यासाठी (Health) सर्वांकडूनच प्रार्थना केल्या जात आहेत. 10 आॅगस्ट रोजी राजू श्रीवास्तव यांना दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेंव्हापासून सतत डाॅक्टरांची तज्ज्ञ टीम राजू यांच्यावर उपचार करते आहे.

राजू श्रीवास्तव अजूनही व्हेंटिलेटरवर

राजू श्रीवास्तव यांना रूग्णालयात दाखल करून एक महिन्याचा काळ उलटला आहे. राजू अजूनही व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण राजू यांना आतापर्यंत शुद्ध यायला हवी होती, असे डाॅक्टरांचे म्हणणे आहे. राजू यांना शुद्ध येत नसल्याने सर्वचजण चिंतेत आहेत. राजू यांना संसर्गाचा धोका अधिक असल्याने फक्त त्यांच्या पत्नीलाच त्यांच्याजवळ जाण्याची परवानगी डाॅक्टरांनी देखील होती. मात्र, डाॅक्टरांनी राजू यांच्या मुलांना त्यांना भेटू दिले आहे.

हे सुद्धा वाचा

राजू श्रीवास्तव यांच्यावर उपचार करत असलेल्या डाॅक्टरांनी दिली माहिती

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी आता एक मोठे विधान केले असून डॉक्टर म्हणाले की, आता काही सांगता येणार नाही. यामुळे राजू श्रीवास्तव यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. मात्र येत्या काही दिवसांत राजू यांच्या तब्येतीमध्ये काही सुधारणा होते का हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. राजू श्रीवास्तव यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी अजून कोणतेच अधिकृत विधान केले नाहीये.