Hardeek Joshi: राणादा-पाठकबाई ‘या’ ठिकाणी बांधणार लग्नगाठ

काही दिवसांपूर्वीच या दोघांनी साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. आता ही जोडी खऱ्या आयुष्यात लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यापूर्वी 'चला हवा येऊ द्या' या कॉमेडी शोमध्ये अक्षया आणि हार्दिकने एकत्र हजेरी लावली.

Hardeek Joshi: राणादा-पाठकबाई या ठिकाणी बांधणार लग्नगाठ
Hardeek Joshi and Akshaya Deodhar
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 23, 2022 | 8:40 AM

‘तुझ्यात जीव रंगला’ (Tujhyat Jeev Rangala) या मालिकेत राणादा आणि पाठकबाईची भूमिका साकारून अभिनेता हार्दीक जोशी (Hardeek Joshi) आणि अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) घराघरात पोहोचले. या मालिकेमुळे दोघांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. आता ही जोडी खऱ्या आयुष्यात लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यापूर्वी ‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी शोमध्ये अक्षया आणि हार्दिकने एकत्र हजेरी लावली. यावेळी सूत्रसंचालक निलेश साबळेने दोघांशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. यावेळी हार्दिक आणि अक्षयाने एकमेकांबद्दलच्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या. त्याचप्रमाणे लग्न कुठे करणार तेसुद्धा सांगितलं.

अक्षयाच्या स्वभावाविषयी विचारलं असता हार्दिक म्हणाला, “मला अक्षयाचा स्वभाव खूप चांगल्या पद्धतीने माहित आहे. ती कोणत्या गोष्टीवर कशा पद्धतीने प्रतिक्रिया देईल हे मला आधीच माहित असतं. थोडक्यात म्हणायचं झालं तर वाघ कधी डरकाळी फोडेल हे मला माहित आहे (हसतो).” विवाहस्थळाविषयी प्रश्न विचारला असता हार्दिकने पुण्यात लग्नसोहळा पार पडणार असल्याचं सांगितलं. “आम्ही विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांना त्यांच्या लग्नस्थळाविषयी माहिती विचारली. आम्हीसुद्धा तिथेच लग्न करण्याचा विचार करत आहोत”, असं हार्दिकने सांगितलं. साखरपुड्यातील पोशाख दोघांनीही खास कोल्हापूरहून मागवला होता. “तुझ्यात जीव रंगला ही आमची मालिका कोल्हापूरच्या कहाणीवर आधारित होती. म्हणूनच आम्ही साखरपुड्यासाठी खास कोल्हापूरवरून कपडे मागवले होते. मालिकेच्या आठवणी जपण्यासाठी आम्ही तसा प्लॅन केला होता”, असं हार्दिक म्हणाला.

अक्षयाबद्दलची कोणती गोष्ट तुला आवडत नाही असा प्रश्न विचारला असता तो म्हणाला, “तिला राग लगेच येतो. रागात असताना ती काहीही बोलू शकते आणि काहीही करू शकते. लग्नानंतर तिने ही एक गोष्ट बदलावी अशी माझी इच्छा आहे.” हार्दिक आणि अक्षयाने 3 मे रोजी ठाण्यात साखरपुडा केला. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या सेटवरच दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती.