‘कुटुंब कितीही मोठं असलं तरी चूल एक असली ना की घर बांधलेलं राहतं!’, ‘राणा दा’च्या मालिकेचा नवा प्रोमो पाहिलात का?

‘तुझ्यात जीव रंगला’नंतर आता हार्दिक जोशी आता ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ असं म्हणणार आहे. या मालिकेत नवोदित अभिनेत्री अमृता पवार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे.

‘कुटुंब कितीही मोठं असलं तरी चूल एक असली ना की घर बांधलेलं राहतं!’, ‘राणा दा’च्या मालिकेचा नवा प्रोमो पाहिलात का?
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?
| Edited By: | Updated on: Aug 21, 2021 | 1:51 PM

मुंबई : छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेली ‘तुझ्यात जीव रंगला’ (Tujhyat Jeev Rangla) सद्य घडीला ही मालिका ऑफ एअर गेली असली तरी, मालिकेतील कलाकारांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. या मालिकेतील ‘राणा दा’, ‘पाठक बाई’, ‘नंदिता वहिनी’, ‘गोदाक्का’, ‘बरकत’ ही पात्र खूप लोकप्रिय झाली होती. त्यातही ‘राणा दा-अंजली बाई’ ही जोडी छोट्या पडद्यावर विशेष गाजली. मालिका ऑफ एअर गेल्यानंतर सगळेच प्रेक्षक आपल्या लाडक्या कलाकारांना मिस करत आहेत. मात्र, आता ‘राणा दा’ एका नव्या रुपात लवकरच चाहत्यांचा भेटीला येणार आहे.

‘राणा दा’ साकारणारा अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठी वाहिनीवर सुरु होत असलेली नवी मालिका ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?’ (Tuzhya Majhya Sansarala Aani Kay Hava) यात हार्दिक मुख्य भूमिका साकारत आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’नंतर आता हार्दिक जोशी आता ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ असं म्हणणार आहे. या मालिकेत नवोदित अभिनेत्री अमृता पवार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे.

पाहा प्रोमो :

या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, नवी नवरी आता घरात आली आहे. इतकचं नाही तर, तिने या घरातील स्वयंपाक घराचा ताबा घेतला आहे. यावेळी ती घरातील एका पातेल्यात चहा करायला ठेवत असते, इतक्यात तिच्या सासूबाई येतात आणि तिला एका मोठ्या टोपाकडे इशारा करून आपण यात चहा करतो असं म्हणतात. तर यावर नायिका म्हणते की, मला वाटलं हे भाताचं टोप आहे. यावर सासूबाई मोठ्या हंडीकडे बोट करून म्हणतात की आपण यात भात शिजवतो. ‘कुटुंब कितीही मोठं असलं तरी चूल एक असली ना की घर बांधलेलं राहतं!’, असं म्हणत ते आपल्या सुनेला कुटुंब एकत्र कसं ठेवायचं हे सांगतात.

अमृता पवार दिसणार मुख्य भूमिकेत!

‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत अभिनेत्री अमृता पवार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 30 ऑगस्टपासून रात्री 9 वाजता ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. नुकतंच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि पाहता पाहता या प्रोमोला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे.

हार्दिक जोशीचं कमबॅक

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेला आणि त्यात हार्दिक जोशी सकारात असलेल्या ‘राणा दा’ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. ही मालिका बंद झाल्यानंतरही चाहते त्यातील कलाकारांच्या कमबॅकची आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळेच हार्दिक जोशीला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहून प्रेक्षक प्रचंड आनंदित झाले आहेत.

हेही वाचा :

जेव्हा KBCच्या सेटवर अमिताभ बच्चन आणि सचिन खेडेकरांची भेट होते! ‘कोण होणार करोडपती’च्या सेटवर बिग बींची हजेरी!

‘शालू’चं लगीन ठरलंय?; राजेश्वरी खरातच्या ब्रायडल लूकने चाहतेही गोंधळात!