जेव्हा KBCच्या सेटवर अमिताभ बच्चन आणि सचिन खेडेकरांची भेट होते! ‘कोण होणार करोडपती’च्या सेटवर बिग बींची हजेरी!

सध्या 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचं चित्रीकरण मुंबई फिल्मसिटीमध्ये सुरू आहे. 'कोण होणार करोडपती' आणि 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमांचं पहिल्यांदाच एकत्र चित्रीकरण होतं आहे. 12 जुलैपासून 'कोण होणार करोडपती' सुरू झालं होतं.

जेव्हा KBCच्या सेटवर अमिताभ बच्चन आणि सचिन खेडेकरांची भेट होते! ‘कोण होणार करोडपती’च्या सेटवर बिग बींची हजेरी!
कोण होणार करोडपती
Follow us
| Updated on: Aug 21, 2021 | 1:27 PM

मुंबई : छोट्या पडद्यावर गाजलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या प्रसिद्ध कार्यक्रमाचा मराठी अवतार म्हणजे ‘कोण होणार करोडपती’ (Kon Honar Karodpati). 2019ला या कार्यक्रमाचे पहिले पर्व प्रदर्शित झाल्यावर गेल्यावर्षी कोरोनामुळे या कार्यक्रमाला विश्राम घ्यावा लागला होता. परंतु, आता कोरोना परिसथिती थोडी आटोक्यात आल्यावर आता दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचे सूत्रसंचालन ‘सैराट’ फेम नागराज मंजुळे यांनी केले होते व आता दुसऱ्या भागासाठी जेष्ठ अभिनेते सचिन खेडेकर (Sachin Khedekar) यांची वर्णी लागलीय. मराठी घराघरांत सगळ्यांना सचिन खेडेकर परिचित आहेत. ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम सगळ्यांच्या पसंतीस उतरतो आहे.

‘बिग बीं’नी केलं कौतुक

सध्या ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाचं चित्रीकरण मुंबई फिल्मसिटीमध्ये सुरू आहे. ‘कोण होणार करोडपती’ आणि ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमांचं पहिल्यांदाच एकत्र चित्रीकरण होतं आहे. 12 जुलैपासून ‘कोण होणार करोडपती’ सुरू झालं होतं. या दोन्ही कार्यक्रमांचं चित्रीकरण हे शेजारीशेजारी असलेल्या सेट्सवर सुरू आहे. जेव्हा ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांना समजलं की, बाजूच्या सेटवर ‘कोण होणार करोडपती’चं चित्रीकरण सुरू आहे, तेव्हा त्यांनी सचिन खेडेकर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. सचिन खेडेकर आणि अमिताभ बच्चन यांची भेट झाली, तेव्हा अमिताभ बच्चन यांनी ‘कोण होणार करोडपती’चं भरभरून कौतुक केलं आणि हा कार्यक्रम आपण पाहत असल्याचा आवर्जून उल्लेख केला!

पाहा पोस्ट :

कोण होणार करोडपती

‘कोण होणार करोडपती’ सोनी मराठी वाहिनीवर सोम.-शनि रात्री 9 वा. पाहायला मिळणार आहे. कोण होईल मराठी करोडपती हा एक गेम शो आहे. सोनी हिंदी वाहिनीवर कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेमुळे याचं मराठीमध्ये रुपांतर करण्यात आलं. याचे तीन पर्वे कलर्स मराठी वाहिनी आणि नंतरची पर्वे सोनी मराठी वाहिनीवर प्रदर्शित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे सचिन खेडेकर, स्वप्नील जोशी आणि नागराज मंजुळे यांनी विविध पर्वात सूत्रसंचालन केले होते. ही मालिका 2013 रोजी प्रसारित झाली होती.

स्पर्धकाकडून सचिन खेडेकरांचे कौतुक

नुकतेच या मंचावर मंगला हरडे यांनी स्पर्धक म्हणून हजेरी लावली. यावेळी त्यांनी सचिन खेडेकरांचं तोंड भरुन कौतुक केलं. त्या म्हणाल्या, ‘आम्हाला तुम्हाला लवकरच पोलिसांच्या भूमिकेत बघायचं आहे. सोबतच तुम्ही कॅमेऱ्यापेक्षा रिअलमध्ये जास्त सुंदर दिसता मला. मी आल्यापासून तुम्हालाच बघत होते पहिल्या दिवसापासून, माझं मनच डायव्हर्ट होत होतं. माझ्या ताईनं मला रागावलं की तु त्यांच्याकडे बघु नकोस तुझं मन डायव्हर्ट होतंय. त्यामुळे आज आल्यापासून मी तुमच्याकडे पाहिलंच नाही..त्यामुळे आता तुम्हाला पोटभर बघते आहे’ मंगला यांच्या या वाक्यावरुन सेटवर सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं होतं.

हेही वाचा :

‘शालू’चं लगीन ठरलंय?; राजेश्वरी खरातच्या ब्रायडल लूकने चाहतेही गोंधळात!

मांडव सजलाय अंगणदारी, नटून थटून तयार नवरदेवाची स्वारी, स्वीटूच्या ओमच्या वेडिंग लूक पाहिलात का?

Non Stop LIVE Update
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?.
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?.
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट.
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक.
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका.
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी.
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका.
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?.
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत.
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात.