Hina Khan | या सीरिजच्या प्रमोशनसाठी हिना खान हिने केला ब्रेकअपचा पब्लिसिटी स्टंट

ये रिश्ता क्या कहलाता है ही मालिका सोडल्यानंतर हिना बिग बाॅसच्या घरामध्ये गेली होती.

Hina Khan | या सीरिजच्या प्रमोशनसाठी हिना खान हिने केला ब्रेकअपचा पब्लिसिटी स्टंट
| Updated on: Dec 07, 2022 | 5:21 PM

मुंबई : ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेमधून हिना खान हिला एक वेगळी ओळख मिळालीये. हिना खान हिला आजही लोक अक्षरा या नावाने जास्त ओळखतात. आज जरी हिना या मालिकेचा हिस्सा नसली तरीही चाहते तिला या मालिकेमध्ये मिस करतात. ये रिश्ता क्या कहलाता है ही मालिका सोडल्यानंतर हिना बिग बाॅसच्या घरामध्ये गेली होती. हिना सोशल मीडियावर कायमच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी अत्यंत बोल्ड फोटो शेअर करते. मात्र, कालपासून हिना थोड्या वेगळ्याच गोष्टीमुळे प्रचंड चर्चेत आलीये.

हिनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ती पोस्ट पाहून सर्वांनी असा अंदाजा बांधला की, हिना खान हिचे ब्रेकअप झाले असून तब्बल 13 वर्षांनंतर रॉकी जायसवाल याने तिला धोका दिला आहे.

हिनाची सोशल मीडियावरील पोस्ट पाहून चाहते देखील चिंतेमध्ये आले होते. नेमके असे काय झाले की, 13 वर्षांचे हिना आणि रॉकी यांचे रिलेशन तुटले? मात्र, रॉकी आणि हिना यांचे ब्रेकअप वगैर काही झाले नसून हा फक्त पब्लिसिटी स्टंट असल्याचे कळत आहे.

हिना खान हिची षडयंत्र ही सीरिज लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. याचेच प्रमोशन करण्यासाठी तिने सोशल मीडियावर ती ब्रेकअपची पोस्ट टाकली असल्याचे आता उघड झाले आहे.

हिनाने विश्वासघात हे एकमात्र सत्य आहे जे टिकून राहते अशी पोस्ट केली होती. आता हे सीरिजच्या प्रमोशनसाठी तिने केल्याचे कळातच नेटकऱ्यांनी हिनाचा चांगलाच क्लास घेतल्याचे दिसत आहेत.

अनेकजण हिना खान हिला सोशल मीडियावर ट्रोल करताना दिसत आहेत. एका युजर्सने लिहिले की, हे लोक चित्रपट असो किंवा सीरिजच्या प्रमोशनसाठी काय करतील याचा अजिबात नेम नाही.