‘फसवणूक केल्यास त्याच्याशी माझा कोणताही संबंध नसेल’; आदेश बांदेकरांची पोस्ट चर्चेत

| Updated on: Mar 12, 2022 | 6:01 PM

'होम मिनिस्टर' (Home Minister) या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांची मनं जिंकणारे आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांची सोशल मीडियावरील एक पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या आडनावाचा गैरवापर करून लोकांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात चाहत्यांना आवाहन केलं आहे.

फसवणूक केल्यास त्याच्याशी माझा कोणताही संबंध नसेल; आदेश बांदेकरांची पोस्ट चर्चेत
Aadesh Bandekar
Image Credit source: Instagram
Follow us on

‘होम मिनिस्टर’ (Home Minister) या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांची मनं जिंकणारे आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांची सोशल मीडियावरील एक पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या आडनावाचा गैरवापर करून लोकांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात चाहत्यांना आवाहन केलं आहे. संबंधित व्यक्ती आपली नातेवाईक असल्याचं सांगून लोकांची फसवणूक करत आहे आणि लोकांकडून पैशांची मागणी करत आहे, अशी तक्रार त्यांनी केली आहे. काळजी घ्या, असं कॅप्शन देत त्यांनी ही पोस्ट लिहिली आहे. कोणाशीही आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी, असं त्यांनी म्हटलंय.

आदेश बांदेकरांची पोस्ट-

‘बांदेकर हे आडनाव किंवा या आडनावाशी साधर्म्य साधणारे बरेचजण मनोरंजनाबरोबर विविध क्षेत्रात वावरत आहेत. यापैकी कोणाशीही व्यवहार करताना काळजी घ्यावी. माझे नातेवाईक आहे असं सांगून कोणी आपली फसवणूक केल्यास त्याच्याशी माझा कोणताही संबंध नसेल,’ असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

याआधी अभिनेत्री जुई गडकरी, भरत जाधव यांनासुद्धा अशाच समस्यांना सामोरं जावं लागलं. लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना जागरूक राहण्याचं आवाहन केलं होतं. आदेश बांदेकर हे गेल्या 19 वर्षांपासून ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत. कोरोना आणि लॉकडाउनच्या काळातही त्यांनी घरातूनच या कार्यक्रमाचं शूटिंग केलं होतं. लॉकडाउनमध्येही या शोचे नवे एपिसोड्स प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.

हेही वाचा:

पाणीला पानी म्हणणारेही मराठी इंडस्ट्रीत, त्यांना पाहून राग अनावर होतो- उषा नाडकर्णी

‘काढण्यासारखं थोडं काही, वेचण्यासारखं खूप काही’; ‘झुंड’बाबत ‘धुरळा’च्या लेखकाची पोस्ट चर्चेत