AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketaki Chitale: ‘बिग बॉस मराठी 4’मध्ये सहभागी झाल्याच्या चर्चांवर केतकी चितळेचं सडेतोड उत्तर, “पैशांसाठी मी..”

केतकी कधी तिच्या पोस्टमुळे तर कधी वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनसाठी तिला नक्कीच विचारलं गेलं असणार असा अंदाज नेटकरी व्यक्त करत आहेत. या सर्व चर्चांवर खुद्द केतकीने उत्तर दिलं आहे.

Ketaki Chitale: 'बिग बॉस मराठी 4'मध्ये सहभागी झाल्याच्या चर्चांवर केतकी चितळेचं सडेतोड उत्तर, पैशांसाठी मी..
Ketaki Chitale: 'बिग बॉस मराठी 4'मध्ये सहभागी झाल्याच्या चर्चांवर केतकी चितळेचं सडेतोड उत्तरImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 04, 2022 | 6:31 PM
Share

टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय रिॲलिटी शो बिग बॉस मराठीचा चौथा (Bigg Boss Marathi 4) सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या सिझनचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून यामध्ये कोणकोणते सेलिब्रिटी सहभागी होऊ शकतील याविषयी नेटकरी विविध अंदाज व्यक्त करत आहेत. त्यामध्ये अभिनेत्री केतकी चितळेचं (Ketaki Chitale) नाव सर्वाधिक चर्चेत आहे. आपल्या एका फेसबुक पोस्टमुळे (FB Post) केतकी सोशल मीडियावर तुफान चर्चेत होती. केतकी कधी तिच्या पोस्टमुळे तर कधी वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनसाठी तिला नक्कीच विचारलं गेलं असणार असा अंदाज नेटकरी व्यक्त करत आहेत. या सर्व चर्चांवर खुद्द केतकीने उत्तर दिलं आहे.

केतकीने बिग बॉस मराठीच्या घरात जाणार नसल्याचं स्पष्ट करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. इतकंच नव्हे तर तिने बिग बॉसमध्ये सहभागी होण्याच्या वृत्तावर सडेतोड उत्तर दिलं आहे. केतकीने या शोच्या संकल्पनेवर टीका केली आणि पुढे म्हणाली की या शोमध्ये सहभागी होणं हे तिच्या दृष्टीने कमी दर्जाचं असेल.

काय म्हणाली केतकी?

“दरवर्षीप्रमाणे पुन्हा एकदा या चर्चांना उधाण आलंय आणि त्यामुळे पुन्हा मला उत्तर द्यावं लागतंय. बिग बॉससारख्या नकारात्मकता पसरवणाऱ्या टीव्ही शोजना मी प्रोत्साहन देत नाही. त्यामुळे अशा अर्थहीन प्रयोगात सहभागी होणं म्हणजे मी माझा दर्जा कमी करणं असेल आणि नाही. मी पैशासाठी माझा दर्जा कमी करू शकत नाही.”

बिग बॉसमध्ये सहभागी होण्याच्या चर्चांना उधाण देणाऱ्यांना ती पुढे म्हणाली, “प्रत्येक वेळी जर कोणी मला बिग बॉसमधील सहभागाबद्दल विचारण्याऐवजी एक रुपया एपिलेप्सी संशोधनासाठी दान केला असता, तर आत्तापर्यंत आपल्याकडे स्टाफची सोय झाली असतीआणि वृत्त माध्यमांनी विशेषत: बिग बॉससंदर्भात माझं नाव छापताना प्रत्येक वेळी हजार रुपये दान केले पाहिजेत.”

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...