
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बॉस... 'कोकण हार्टेड गर्ल' अर्थात अंकिता प्रभू वालावलकर... अंकिता सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. ती वेगवेगळ्या पोस्ट ती शेअर करत असते.

अंकिता वालावलकर सध्या बिग बॉसच्या घरात आहे. ती कणखरपणे खेळताना दिसते. नुकत्याच झालेल्या कॅप्टनन्सी टास्कमध्ये ती जिंकली. सध्या ती बिग बॉसच्या घराची कॅप्टन आहे.

तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नुकतंच काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. ब्लॅक कलरच्या आऊटफिटमध्ये अंकिताने फोटोशूट केलंय.

बिग बॉसच्या घरातील 'बॉस लेडी'... कॅप्टन अंकिता बिग बॉसच्या घराचा भार सांभाळण्यासाठी सज्ज झाली आहे.... असं म्हणत अंकिताचे हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोंना पसंती दिलीय.

नेटकऱ्यांनी कमेंट करत अंकिताच्या लूकला पसंती दिली आहे. खूपच सुंदर दिसत असल्याचं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. मी माझ्या घरच्यांना कधीच सांगितलंय की अंकिताच बिग बॉस जिंकणार... आणि हे 100% खरंय, अशी कमेंट तिच्या चाहत्याने केलीय.