Zee Marathi: झी मराठीवरील नव्या मालिकेची उत्सुकता; ‘अप्पी आमची कलेक्टर’मधून नवोदित अभिनेत्रीचं पदार्पण

या मालिकेत अपर्णा माने (अप्पी) या मध्यवर्ती भूमिकेतून नवोदित अभिनेत्री शिवानी नाईक (Shivani Naik) पदार्पण करणार आहे. शिवानीने याआधी अनेक एकांकिका स्पर्धांमधून भाग घेतला आहे.

Zee Marathi: झी मराठीवरील नव्या मालिकेची उत्सुकता; अप्पी आमची कलेक्टरमधून नवोदित अभिनेत्रीचं पदार्पण
'अप्पी आमची कलेक्टर'मधून नवोदित अभिनेत्रीचं पदार्पण
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 03, 2022 | 10:46 AM

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर ‘अप्पी आमची कलेक्टर’ (Appi Amchi Collector) या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. या मालिकेत अपर्णा माने (अप्पी) या मध्यवर्ती भूमिकेतून नवोदित अभिनेत्री शिवानी नाईक (Shivani Naik) पदार्पण करणार आहे. शिवानीने याआधी अनेक एकांकिका स्पर्धांमधून भाग घेतला आहे. ही मालिका एक वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अपर्णा सुरेश माने म्हणजे अप्पी, ही ती मुलगी आहे जी ग्रामीण भागातील खेडेगावात राहते. जिथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. तिला कुठले मार्गदर्शन नाही. पण तिचं ध्येय खुप मोठ्ठं आहे. तिला येणाऱ्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करुन ती कलेक्टर होते. अशी ही तिची संघर्षकथा आहे.

आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना शिवानी म्हणाली, “मी खूप भाग्यवान आहे की मला झी मराठीच्या मंचावर काम करण्याची संधी मिळतेय. एक नवीन जबरदस्त प्रेरणा असणारी एक मोठी संकल्पना उराशी बाळगून अनेक अडचणींवर मात करून आपले ध्येय साध्य करणाऱ्या मुलीची भूमिका मला करायला मिळणार आहे. मी खूप खुश आहे कारण मी एका ध्येयसमर्पित मुलीची भूमिका करणार आहे आणि ही अप्पी प्रेक्षकांना नक्कीच प्रेरणा देणारी ठरेल.”

पहा मालिकेचा प्रोमो-

या मालिकेची निर्मिती वज्र प्रॉडक्शन्सने केली आहे. याआधी या प्रॉडक्शन हाऊसच्या झी मराठी वाहिनीवर लागीर झालं जी, देवमाणूस, देवमाणूस 2 या मालिका गाजल्या आहेत. त्यामुळे या मालिकेबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘आप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका येत्या 22 ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.