AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 की 6 अजित दादांसोबत विमानात किती लोक?, पायलट जिवंत आहे का? रोहित पवारांनी सगळंच सांगितलं, म्हणाले तो पायलट…

अजित पवारांच्या विमान अपघातातील पायलट जिवंत असल्याच्या अफवांवर रोहित पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी त्यांनी अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

5 की 6 अजित दादांसोबत विमानात किती लोक?, पायलट जिवंत आहे का? रोहित पवारांनी सगळंच सांगितलं, म्हणाले तो पायलट...
rohit pawar ajit pawar
| Updated on: Feb 27, 2026 | 12:43 PM
Share

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. अजित पवारांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. त्यांच्या निधनानंतर या प्रकरणी नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे सातत्याने अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशी करावी, त्याबद्दलची एफआयआर नोंदवून घ्यावी अशी मागणी करत आहेत. त्यातच आता रोहित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर रोहित पवारांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

रोहित पवार यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना अजित पवारांच्या मृत्यूनंतर देशभरातील जनतेकडून अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. काही लोक विमानातील पायलट जिवंत असल्याचे बोलत आहेत, ते कोणत्या तरी देशात आहेत, असेही बोललं जात, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिले.

रोहित पवार काय म्हणाले?

अजित दादांचा विमान जे पायलट चालवत होते, ते जिवंत आहेत, असं समजून चालणार नाही. ज्या पायलटची आधी ते विमान चालवण्यासाठी नियुक्ती झाली होती, त्यानंतर मग अचानक ते कॅन्सल झाले. ते पायलट तिथे आहेत. त्यामुळे हा विषय इथे राहत नाही, असे रोहित पवार म्हणाले.

या विमानात जे कोणी पायलट होते, त्यात दादा होते, असेंडेट माळी ताई होत्या, जाधव नावाचे सिक्युरिटी होते, पाठक नावाच्या को पायलट आणि कपूर नावाचे मेन पायलट होते. हे पाचही व्यक्ती दुर्दैवाने आज आपल्यात नाहीत. त्यामुळे जर कोणी सांगत असेल ही व्यक्ती जिवंत आहे ती व्यक्ती जिवंत आहे. असं काहीही नाही. अपघात झाला की घातपात झाला याबद्दलची माहिती आपल्याला घ्यायाची आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतोय, असेही रोहित पवारांनी म्हटले.

राज्यातील जनता दादाला न्याय देणार

महाराष्ट्रात एफआयआर घेतला जात नाही. एफआयआर देणं हा आमचा अधिकार आणि घेणं त्यांचं कर्तव्य आहे. राज ठाकरे मराठी माणसासाठी लढत आले आहेत. राज ठाकरे या विषयाला न्याय देणार आहे. राज्यातील जनता दादाला न्याय देणार आहे. त्यांनी सांगितलं की, विचारायचं कारण नाही. न्याय कसा मिळेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असेही रोहित पवारांनी सांगितले.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या