AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar Plane Crash : तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या रोहित पवारांना मुख्यमंत्री कार्यालयातून फोन, काय झालं बोलणं?

अजित पवार विमान अपघात चौकशीत रोहित पवार आक्रमक झाले असून, त्यांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून चर्चेसाठी बोलावणे आले आहे. 'देवगिरी'वर स्मारक आणि अपघाताच्या संशयास्पद पैलूंवर उद्याच्या बैठकीत चर्चा होणार असून, बारामतीमध्ये तणावाचे वातावरण आहे.

Ajit Pawar Plane Crash : तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या रोहित पवारांना मुख्यमंत्री कार्यालयातून फोन, काय झालं बोलणं?
rohit pawar devendra fadnavis
| Updated on: Feb 26, 2026 | 1:34 PM
Share

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारी रोजी झालेल्या भीषण विमान अपघाताने महाराष्ट्र हादरला आहे. त्यांच्या निधनानंतर या प्रकरणी नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशी करावी, अशी मागणी वारंवार केली आहे. आज यासंदर्भात त्यांना बारामती पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची मागणी केली. मात्र अद्याप ही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. त्यातच आता रोहित पवारांना थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडून (CMO) फोन आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयातून फोन कशासाठी? रोहित पवारांचा खुलासा

नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी मुख्यमंत्री कार्यालयातून आलेल्या फोनबाबत सविस्तर माहिती दिली. आम्ही एवढे मोठे नाही की आम्हाला मुख्यमंत्री फोन करतील. मला मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून फोन आला होता. अजितदादांच्या स्मारकाबाबतचा एक विषय मी मांडत होतो, त्याबद्दल चर्चा करायची होती. आज ती बैठक होणार नाही. पण उद्या संध्याकाळी ती बैठक होईल, असे रोहित पवार म्हणाले.

आगामी अर्थसंकल्पात या स्मारकासाठी निधीची तरतूद करण्याबाबत चर्चा करण्यासाठी हा फोन आला होता. या बैठकीत आम्ही अजित दादांचे स्मारक व्हावं ही मागणी करुच, पण त्यासोबतच चौकशीबद्दलची जी काही माहिती माझ्याकडे आहे, त्याबद्दलचीही माहिती आम्ही त्यांना देऊ. तसेच माझ्याकडे जे काही कागदपत्रे आलेत ते देखील मी त्यांना देईन, असे रोहित पवारांनी सांगितले.

रोहित पवार यांनी यावेळी CID आणि DGCA यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले आहेत. या नियमानुसार अपघाताचा प्राथमिक अहवाल १५ फेब्रुवारीपर्यंत येणे अपेक्षित होते. मात्र, २४ तारीख उलटूनही DGCA ने कोणताही अधिकृत रिपोर्ट दिलेला नाही. बारामतीकरांनी जो बंद पाळला आणि जनतेने जो रोष व्यक्त केला, त्यामुळेच आता DGCA आणि CID वर दबाव आला आहे. आज CID पत्रकार परिषद घेऊन काय सांगणार आहे, याकडे आमचे लक्ष आहे, असेही रोहित पवार म्हणाले.

गुन्हा दाखल करून घेण्यास नकार

दरम्यान अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिला होता. याप्रकरणी रोहित पवार यांनी थेट बारामती पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी त्यांनी रोहित पवार, युगेंद्र पवार आणि वडील राजेंद्र पवार यांच्यासह बारामती पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी DGCA आणि विमान कंपनी VSR विरोधात तक्रार अर्ज दिला. यावेळी बारामती पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने अजित पवारांचे समर्थक जमा झाले होते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...