AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar: अजितदादांचा घातपात की अपघात? राज ठाकरे यांनी रोहित पवारांना दिला तो शब्द, मनसे पण मैदानात?

Rohit Pawar on Raj Thackeray: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थवर जाऊन भेट घेतली. अजितदादांचा घातपात की अपघात या मुद्दावर त्यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी राज ठाकरे हे त्यांना काय म्हणाले याची त्यांनी माहिती दिली.

Rohit Pawar: अजितदादांचा घातपात की अपघात? राज ठाकरे यांनी रोहित पवारांना दिला तो शब्द, मनसे पण मैदानात?
रोहित पवार, राज ठाकरेImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 27, 2026 | 12:51 PM
Share

Rohit Pawar on Raj Thackeray: आमदार रोहित पवार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. अजितदादांचा विमान अपघात की घातपात या मुद्दावर त्यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सव्वा तास चर्चा झाली. या दरम्यान रोहित पवार यांच्याकडून राज ठाकरे यांनी विमान अपघाताची माहिती घेतली. राज ठाकरे यांनी यावेळी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की, पोलिसांनी FIR को नोंदवून घेतला नाही. त्यांनी एकच प्रश्न केला की राज्यातील एका मोठ्या नेत्याचा अपघाती मृत्यू झाला आहे, त्याचा एफआयआर नोंदवला जात नाही हे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.

रोहित पवार-राज ठाकरे यांच्या भेटीत काय चर्चा

राज ठाकरे यांच्या भेटीसाठी रोहित पवार यांनी वेळ मागितला. त्यांनी अमित ठाकरे यांच्याशी बोलणे करून ही वेळ घेतली. अजितदादांच्या विमान अपघाताविषयी बोलायचं असल्याचे सांगितल्यावर राज ठाकरे यांनी लागलीच वेळ दिल्याचे रोहित पवार म्हणाले. आज इथे आल्यावर बराच वेळ त्यांनी सर्व घटना समजून घेतल्या. जी माहिती घेऊन गेलो. ती त्यांनी समजून घेतली. त्यांनी सांगितलं की, सर्वात महत्त्वाचा प्रश्न एवढाच आहे की एफआयआर पोलिसांनी का घेतला नाही. त्यांचा अभ्यास चांगला असल्याने त्यांनी मला सर्वोच्च न्यायालयाचे दोन दाखले दिले, असे रोहित पवार यांनी सांगितले.

राज ठाकरे न्याय देतील

यावेळी राज ठाकरे म्हणाले, दादांना ओळखत होतो. आम्ही एकत्र काम केलं. दादा असो का आणि इतर काय मराठी माणसासाठी जे करायचं ते आम्ही करू. राज ठाकरे मराठी माणसासाठी लढत आले आहेत. राज ठाकरे या विषयाला न्याय देणार आहेत. राज्यातील जनता दादाला न्याय देणार आहे. त्यांनी सांगितलं की, विचारायचं कारण नाही. न्याय कसा मिळेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असे रोहित पवार यांनी राज ठाकरे यांच्या भेटीनंतर सांगितले.

व्यक्तिगत लेव्हलला. भावनिक लेव्हलला मी राज ठाकरेंना भेटलो. मनात जे होतं ते बोललो. कागद दाखवला. मी काही अपेक्षा केली नाही. मराठी माणसाच्या पाठी ते भक्कम राहिले आहेत. ते सरळ बोलणारे नेते आहेत. त्यांच्याक़डून अपेक्षा आहे. मी बोलून दाखवलं नाही. ते मला पाठिंबा देतीलच, असा विश्वास यावेळी रोहित पवार यांनी बोलून दाखवला. अजितदादांच्या विमान अपघात की घातपात याविषयी रोहित पवार हे जनतेशी संवाद साधत होते. आता ते विविध पक्षाच्या नेत्यांशी संवाद साधत असल्याचे दिसते. त्यांनी याविषयावर राज ठाकरे यांची आज भेट घेतली. ते अजून कोणत्या नेत्याला भेटतात याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

Follow Us
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी….

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी…

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?