
‘बिग बॉस मराठी’ च्या या सिझनची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा आहे. बिग बॉसच्या घरात काय घडतं, काय बिघडतं हे जाणून घ्यायला प्रेक्षकांना आवडतं. ‘बिग बॉस मराठी’ च्या घरातील हा चौथा आठवडा वादाचा ठरत आहे. कारण टीम एमध्ये फूट पडल्याचं दिसत आहे. निक्की तांबोळी आणि तिच्या टीम एमधील सदस्यांची जोरदार भांडणं झाली आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात निक्की आणि घन:श्याममध्ये कल्ला झालेला पाहायला मिळाला. आता आजच्या भागाचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अरबाज आणि निक्कीच्या मैत्रीत फूट पडलेली दिसून येत आहे.
‘बिग बॉस मराठी’ च्या घरातील नवा प्रोमोसमोर आला आहे. यात निक्की आणि अरबाजमध्ये कडाक्याचं भांडण झाल्याचं दिसत आहे. निक्की अभिजीतला म्हणत आहे,”तुला वाटतं का की मी मनापासून माफी मागत नाही”. त्यावर अभिजीत म्हणतो,”हा तू मनापासून माफी मागते”. निक्की अभिजीतसोबत बोलल्याने अरबाजचा राग अनावर झाला आहे. आता अभिजीतमुळे निक्की-अभिजीत एकमेकांपासून दूरावणार का? याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.
निक्की तांबोळी आणि वैभव चव्हाण यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. ‘बिग बॉस मराठी’ च्या घरात सध्या ‘सत्याचा पंचनामा’ हे कार्य पार पडत आहे. यासंदर्भातला आजच्या भागाचा एक प्रोमो समोर आला आहे. प्रोमोमध्ये वर्षा ताईंचा सत्याचा पंचनामा होताना दिसत आहे. निक्कीसाठी मी कोणतंही फेव्हर घेणार नाही, असं वैभव म्हणतो. यावर निक्की म्हणते, मी माझ्या मतावर ठाम आहे. त्यावर वैभवही निक्कीला उत्तर देतो. तू थेट तुझं मत मांडू शकत नाही, असं तो म्हणतो. घन:श्यामने निक्कीच्या वागण्यावर भाष्य केलं आहे. निक्कीच्या अशा वागणुकीमुळे टीमचा घात होऊ शकतो, असं तो म्हणतो.
छोटा पुढारी आणि निक्कीमध्ये बहिण-भावाचं नातं निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे. पण आज रक्षाबंधनाच्या दिवशीच या भावा बहिणीच्या नात्यात फूट पडलेली पाहायला मिळणार आहे. निक्की आणि छोटा पुढारीमध्ये मोठा वाद झाला आहे. निक्की घन:श्यामला तू फेक आहेस, असं म्हणते. त्यावर घन:श्याम तिला विचारतो की, काय फेक वागलोय ते तर सांग.. तू किती आपली आहेस हे अख्ख्या जनतेला दिसतंय… तुला सख्ख्या बहिणीचा दर्जा दिला होता मी.. निक्कू ताई बोलल्यामुळेच घात झालाय ना, असं घन: श्याम म्हणाला. त्या निक्की म्हणते की मग नको म्हणूनस बहिण… ‘बिग बॉस मराठी’च्या घरात कधी कोणामध्ये वाद होईल हे सांगू शकत नाही. दोन सख्खे मित्र कधी वैरी होतील हे सांगता येत नाही. ‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागातही प्रेक्षकांना हेच चित्र पाहायला मिळणार आहे.