Raju Srivastava | राजू श्रीवास्तव यांचा ताप कमी होईना, जाणून घ्या नवे हेल्थ अपडेट…

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू असून गेल्या 31 दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवरच आहेत. मध्यंतरी बातम्या आल्या होत्या की, राजू यांना व्हेंटिलेटर वरून काढण्यात आले. मात्र, या अफवा असल्याचे राजू यांच्या कुटुंबियांकडून स्पष्ट करण्यात आले.

Raju Srivastava | राजू श्रीवास्तव यांचा ताप कमी होईना, जाणून घ्या नवे हेल्थ अपडेट...
| Edited By: | Updated on: Sep 10, 2022 | 2:14 PM

मुंबई : प्रसिध्द कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्या तब्येतीबाबत एक नवे अपडेट पुढे येतयं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजू यांना ताप आलायं. गेल्या काही दिवसांपासून राजू श्रीवास्तव यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती मिळत होती. मात्र, नुकतेच मिळालेल्या माहितीनुसार राजू यांना ताप (Fever) आल्याने टेन्शन वाढलयं. डॉक्टरांच्या मते, जोपर्यंत राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूमध्ये हालचाल होत नाही, तोपर्यंत त्यांची प्रकृती स्थिर नसेल. राजू श्रीवास्तव यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात सध्या उपचार (Treatment) सुरू आहेत. गेल्या महिन्यापासून राजू हे रूग्णालयात उपचार घेत आहेत.

राजू श्रीवास्तव यांचा ताप कमी होईना…

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू असून गेल्या 31 दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवरच आहेत. मध्यंतरी बातम्या आल्या होत्या की, राजू यांना व्हेंटिलेटर वरून काढण्यात आले. मात्र, या अफवा असल्याचे राजू यांच्या कुटुंबियांकडून स्पष्ट करण्यात आले. 31 दिवसांपासून राजू हे व्हेंटिलेटरवर आहेत. गेल्या चार ते पाच दिवसांपासून राजू यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती मिळत होती. मात्र, नव्या अपडेटनुसार राजू यांना ताप आल्याची माहिती आहे.

डॉक्टरांनी दिली अत्यंत महत्वाची माहिती

10 ऑगस्ट रोजी जिममध्ये व्यायाम करत असताना राजू यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर ताबडतोब राजू श्रीवास्तव यांना दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून डाॅक्टरांची टिम राजू यांच्यावर उपचार करत आहे. राजू श्रीवास्तव यांची डॉक्टरांनी अँजिओप्लास्टी देखील केली. राजू श्रीवास्तव यांच्या चांगल्या आरोग्यासाठी त्यांच्या चाहत्यांकडून प्रार्थना केल्या जात आहेत. राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीबाबत आता पुढे काय अपडेट मिळते यावर सर्वांच्या नजरा आहेत.