Aai Kuthe Kay Karte : नातं रक्तापलिकडचं…’आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवर अभिनेत्री रुपाली भोसलेला मिळाला नवा भाऊ

| Updated on: Aug 21, 2021 | 3:38 PM

रुपाली म्हणाली, 'आई कुठे काय करते' मालिकेच्या टीममध्ये सामील होऊन मला एक वर्ष झालंय. सेटवरचा पहिला दिवस माझ्या अजूनही लक्षात आहे. मेकअपरुममध्ये माझी भेट घेण्यासाठी संकेत आला आणि त्यानं मला तायडे अशी हाक मारली. त्या दिवसापासून तो मला तायडे अशीच हाक मारतो. (Relationship is beyond blood ... Actress Rupali Bhosle got a new brother on the set of 'Aai Kuthe Kay Karte' serial)

Aai Kuthe Kay Karte : नातं रक्तापलिकडचं...आई कुठे काय करते मालिकेच्या सेटवर अभिनेत्री रुपाली भोसलेला मिळाला नवा भाऊ
Follow us on

मुंबई : काही नाती ही रक्ताच्या नात्याच्या पलीकडची असतात असं म्हटलं जातं. ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) मालिकेतील संजनानं (Sanjana) म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री रुपाली भोसलेला (Rupali Bhosale) मालिकेच्या सेटवर भाऊ मिळाला आहे. आता या रक्षाबंधनाच्या निमित्तानं रुपालीनं सेटवरच्या नव्या भावाविषयी चाहत्यांना खास गोष्टी सांगितल्या आहेत.

हे नातं मी आयुष्यभर जपेन…

रुपाली म्हणाली, ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या टीममध्ये सामील होऊन मला एक वर्ष झालंय. बरोबच एक वर्षापूर्वी माझी आणि आमचं प्रोडक्शन सांभाळणाऱ्या संकेत बरेशी माझी भेट झाली. सेटवरचा पहिला दिवस माझ्या अजूनही लक्षात आहे. मेकअपरुममध्ये माझी भेट घेण्यासाठी संकेत आला आणि त्यानं मला तायडे अशी हाक मारली. त्या दिवसापासून तो मला तायडे अशीच हाक मारतो. माझ्या भावाचं नावही संकेत आहे आणि सेटवरही या संकेतनं मला भावासारखाच जीव लावला आहे. दोघांच्या नावात जसं साम्य आहे अगदी तसंच साम्य त्यांच्या स्वभावातही आहे. माझ्या खोड्या काढणं, थट्टा मस्करी करण्यासोबतच तो माझी खूप काळजीही घेतो. सिल्वासाला जेव्हा आमचं शूट सुरु होतं तेव्हा तो रोज फोन करुन माझी आवर्जून चौकशी करायचा. आई कुठे काय करते मालिकेमुळे मला जशी संजना ही नवी ओळख मिळाली त्याचप्रमाणे या मालिकेने मला एक भाऊही दिलाय. हे नातं मी आयुष्यभर जपेन.

‘आई कुठे काय करते’ मालिकेचा सेट सजला फळं आणि फुलांच्या मळ्यानं

आई कुठे काय करते मालिकेचा सेट फळं आणि फुलांच्या मळ्याने सजला आहे. सेटवर शूटिंगसाठी आणल्या जाणाऱ्या भाज्या फेकून न देता त्यातल्या बियांपासून सेटवरची ही बाग दिमाखात सजली आहे. सेटवरची सर्वच मंडळी या बागेची काळजी घेतात. त्या झाडांना खतपाणी घालतात. हिरवीगार बाग पाहून तर आता बियाणं आणून त्याची छोटीशी शेती केली जातेय. हे सर्वच खूप भारावून टाकणारं आहे.

संजनानं सांगितला खास किस्सा

आई कुठे काय करते मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी रुपाली भोसले सेटवरची हा खास किस्सा सांगताना म्हणाली, मला आणि माझ्या आईला झाडांची लावगड करायला खूप आवडतं. माझ्या घरी सर्व सिझनल भाज्या आणि फुलांची झाडं आम्ही लावली आहेत. त्यामुळे सेटवर देखील अशीच झाडं आमच्या टीमने लावली आहेत. सेटवर आम्ही सेंद्रिय भाज्यांचा आस्वाद घेतो. कधीकधी गरमागरम वाग्यांच्या भरीताचाही बेत असतो. शूटिंगची सुरुवात नेहमी गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने होते. त्यामुळे बाप्पाचरणी सेटवरच्याच जास्वंदीच्या झाडाचं फुल असतं. त्यामुळे सेटवरचं वातावरण अतिशय प्रसन्न करणारं आहे. निसर्गाचं महत्त्व आपल्या सर्वांनाच कळतंय. त्यामुळे सेटवरचा हा नजारा काम करण्यासाठी सर्वांनाच नवी ऊजा देतो.

संबंधित बातम्या

तो बाहुला अन् ती बाहुली, जुळतील का दोघांच्या रेशीमगाठी? पाहा नव्या मालिकेचं नवं शीर्षक गीत

शेवट नव्हे, ही तरी नवी सुरुवात! ‘या’ दिवशी ‘देवमाणूस’चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

Aai Kuthe Kay Karte : ‘आजचा बेत वांग्याचं भरीत’, ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवर फुलली फळबाग; संजनासोबत करुया खास सफर