AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तो बाहुला अन् ती बाहुली, जुळतील का दोघांच्या रेशीमगाठी? पाहा नव्या मालिकेचं नवं शीर्षक गीत

झी मराठी या लोकप्रिय वाहिनीवर आता प्रेक्षकांना मनोरंजनाची नवी मेजवानी मिळणार आहे. 5 नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या मालिकांपैकीच एक म्हणजे “माझी तुझी रेशीमगाठ” (Majhi Tujhi Reshimgath). या मालिकेतून अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) आणि अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

तो बाहुला अन् ती बाहुली, जुळतील का दोघांच्या रेशीमगाठी? पाहा नव्या मालिकेचं नवं शीर्षक गीत
माझी तुझी रेशीमगाठ
| Edited By: | Updated on: Aug 21, 2021 | 11:15 AM
Share

मुंबई : झी मराठी या लोकप्रिय वाहिनीवर आता प्रेक्षकांना मनोरंजनाची नवी मेजवानी मिळणार आहे. 5 नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या मालिकांपैकीच एक म्हणजे “माझी तुझी रेशीमगाठ” (Majhi Tujhi Reshimgath). या मालिकेतून अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) आणि अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तब्बल दहा वर्षानंतर प्रार्थना बेहेरे छोट्या पडद्यावर पुरागमन करतेय. सुशांत सिंह राजपूतसोबत ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत झळकलेल्या प्रार्थनाने मराठी मालिका आणि चित्रपटांमधून काम केले आहे. बऱ्याच वर्षांच्या गॅपनंतर प्रार्थना पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करतेय.

श्रेयस तळपदे नायकाच्या भूमिकेत!

अल्फा मराठी आणि झी मराठीवरील आभाळमाया, अवंतिका दूरदर्शनवरील दामिनी या गाजलेल्या मराठी मालिकांसोबतच हिंदी सिनेसृष्टीमध्ये नावलौकिक मिळवलेला लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे देखील या मालिकेतून मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन करतोय. छोट्या पडद्यावरून श्रेयसने आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली होती आणि आता झी मराठीवरील आगामी मालिका “माझी तुझी रेशीमगाठ” या मालिकेतून श्रेयस तळपदे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे.

या मालिकेच्या शीर्षक गीताची झलक नुकतीच रिलीज झाली आणि या गाण्याची झलक पाहूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मालिकेचं कथानक वेगळं असून एक सुंदर प्रेमकथा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत श्रेयस तळपदे सोबत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे प्रमुख भूमिकेत असणार आहे. या मालिकेतील इतर कलाकार आणि कथानक अजूनही गुलदस्त्यात असून ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

पाहा मालिकेच्या शीर्षक गीताची झलक

नेहमीप्रमाणेच झी मराठीच्या या नव्या मालिकेचं शीर्षकगीत देखील अतिशय कर्णमधुर झालं आहे. ‘धारा धारा.. बेभान वारा…’ अशा बोलीच हे गीत प्रेक्षकांच्या नक्कीच लक्षात राहील.

प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी गोष्ट!

याबद्दल बोलताना श्रेयस म्हणाला, “पुन्हा एकदा आपल्या मराठी टेलिव्हिजनच्या माध्यमातून एका दमदार कथानकासोबत पुनरागमन करताना मला प्रचंड आनंद होतो आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ हि मालिका खूप वेगळी आहे ही एक अनोखी प्रेमकथा आहे जी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे, यातील माझी भूमिका प्रेक्षकांना आपलीशी वाटेल.”

चिमुकली ‘मायरा’ वेधून घेतेय प्रेक्षकांचं लक्ष!

श्रेयस आणि प्रार्थना सोबतच प्रोमोमध्ये झळकणारी चिमुकली मायरा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. मालिका सुरु होण्याआधीच मायरा प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. खऱ्या आयुष्यात श्रेयसची मुलगी आद्या देखील मायरच्या वयाचीच आहे. मायरा बद्दल बोलताना श्रेयस म्हणाला, “मी मायरा सोबत खूप रिलेट करू शकतो. शूट शेड्युलनंतर देखील मायरा आम्हाला सेटवर बिझी ठेवते. ती सेटवर असताना वेळ कसा निघून जातो कळतच नाही. मी एक पिता असल्यामुळे, मला कळतं की, मायराला केव्हा अराम करायचा आहे, तिला केव्हा भूक लागते. मी आद्याला मायराबद्दल सांगितलं आहे आणि तिला प्रॉमिस केलं आहे की, मी तिला एक दिवस तरी सेटवर मायराला भेटायला घेऊन जाणार आहे.”

हेही वाचा :

नव्या मालिका आणि नव्या जोड्या… पाहा कोणकोणत्या कलाकारांची नवी जोडी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

देवमाणसाचा अंत नाहीच? अनेक प्रश्न अनुत्तरीत ठेवून गेलेला ‘देवमाणूस’ पुन्हा परतणार?

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.