‘ऑगस्ट महिना माझ्यासाठी खूप खास…!’, असं का म्हणतोय श्रेयस तळपदे? वाचा

झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या आगामी मालिकेचे प्रोमोज तमाम प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या मालिकेतून अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) मराठी टेलिव्हिजनवर पुनरागम करत आहे. तर अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) मराठी टेलिव्हिजवर पदार्पण करतेय.

‘ऑगस्ट महिना माझ्यासाठी खूप खास...!’, असं का म्हणतोय श्रेयस तळपदे? वाचा
श्रेयस तळपदे
Follow us
| Updated on: Aug 17, 2021 | 7:47 AM

मुंबई : झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या आगामी मालिकेचे प्रोमोज तमाम प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या मालिकेतून अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) मराठी टेलिव्हिजनवर पुनरागम करत आहे. तर अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) मराठी टेलिव्हिजवर पदार्पण करतेय. या दोघांचाही चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्यामुळे चाहते आणि प्रेक्षक यांची मालिकेबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका 23 ऑगस्टपासून रात्री 8:30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

का आहे ऑगस्ट महिना खास?

ऑगस्ट महिना हा श्रेयससाठी खूप खास आहे, अशी भावना त्याने व्यक्त केली आहे. त्याबद्दल बोलताना श्रेयस म्हणाला, “16 वर्षांपूर्वी इक्बाल हा माझा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला, जो माझ्या कारकिर्दीत एक माईलस्टोन ठरला आणि मला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. काही वर्षांपूर्वी मी प्रोड्युस केलेला पोश्टर बॉईझ देखील याच महिन्यात प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी तो डोक्यावर उचलून धरला. आता माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका देखील ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही एक अनोखी प्रेम कथा आहे आणि या मालिकेला देखील चांगला प्रतिसाद देतील याची मला खात्री आहे.”

चिमुकली ‘मायरा’ वेधून घेतेय प्रेक्षकांचं लक्ष!

श्रेयस आणि प्रार्थना सोबतच प्रोमोमध्ये झळकणारी चिमुकली मायरा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. मालिका सुरु होण्याआधीच मायरा प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. खऱ्या आयुष्यात श्रेयसची मुलगी आद्या देखील मायरच्या वयाचीच आहे. मायरा बद्दल बोलताना श्रेयस म्हणाला, “मी मायरा सोबत खूप रिलेट करू शकतो. शूट शेड्युलनंतर देखील मायरा आम्हाला सेटवर बिझी ठेवते. ती सेटवर असताना वेळ कसा निघून जातो कळतच नाही. मी एक पिता असल्यामुळे, मला कळतं की, मायराला केव्हा अराम करायचा आहे, तिला केव्हा भूक लागते. मी आद्याला मायराबद्दल सांगितलं आहे आणि तिला प्रॉमिस केलं आहे की, मी तिला एक दिवस तरी सेटवर मायराला भेटायला घेऊन जाणार आहे.”

प्रार्थनाचं पुनरागमन

सुशांत सिंह राजपूतसोबत ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत झळकलेल्या प्रार्थनाने मराठी मालिका आणि चित्रपटांमधून काम केले आहे. बऱ्याच वर्षांच्या गॅपनंतर प्रार्थना पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करतेय. आगामी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने ही खास पोस्ट लिहिली आहे. ‘10 वर्षांनी टिव्ही वर पुनरागमन करते आहे… तुमच्या घरातली, अगदी तुमच्यातली एक होण्यासाठी… तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहोत, हीच सदिच्छा…!! तुमचीच प्रार्थना बेहेरे !!!…“माझी तुझी रेशीमगाठ ”, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा :

नव्या मालिका आणि नव्या जोड्या… पाहा कोणकोणत्या कलाकारांची नवी जोडी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

देवमाणसाचा अंत नाहीच? अनेक प्रश्न अनुत्तरीत ठेवून गेलेला ‘देवमाणूस’ पुन्हा परतणार?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.