AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या आठवड्याचा हिरो, शेर अकेला…; रितेश देशमुखकडून सूरज चव्हाणचं तोंडभरून कौतुक

Riteish Deshmukh on Suraj Chavan at Bhaucha Dhakka : बिग बॉस मराठीचा यंदाचा सिझन गाजतो आहे. या सिझनमधील स्पर्धकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. बिग बॉस मराठीचा होस्ट रितेश देशमुखची स्टाईलही प्रेक्षकांना आवडते आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेशने सूरज चव्हाणचं कौतुक केलंय. वाचा सविस्तर...

या आठवड्याचा हिरो, शेर अकेला...; रितेश देशमुखकडून सूरज चव्हाणचं तोंडभरून कौतुक
रितेश देशमुख, सूरज चव्हाणImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 18, 2024 | 7:49 AM
Share

सामान्य घरातील मुलगा, रीलस्टार सूरज चव्हाण सध्या बिग बॉस मराठीच्या घरात आहे. ‘बिग बॉस मराठी’चा तिसरा आठवडा गुलीगत सूरज चव्हाणने चांगलाच गाजवला आहे. बिग बॉसच्या घरातील त्याच्या खेळाबद्दल बिग बॉस मराठीचा होस्ट रितेश देशमुख याने सूरज चव्हाणचं कौतुक केलं आहे. विकेंड स्पेशल ‘भाऊचा धक्का’वर रितेशने सूरजचं भरभरून कौतुक केलं आहे. सूरज कॅप्टन झालेला नसला तरी या आठवड्यात त्याने बाजी मारली आहे. पहिले दोन आठवडे शांत असणाऱ्या सूरजने तिसरा आठवड्यात कॅप्टनसी टास्कमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्याची खेळी प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली आहे. त्यामुळे रितेशने सूरजचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

रितेशकडून सूरजचं कौतुक

बिग बॉस मराठीच्या विकेंड स्पेशल ‘भाऊचा धक्का’वर रितेश देशमुखने सूरज चव्हाण याचं कौतुक केलं. सूरजच्या खेळाचं कौतुक केलं. या आठवड्यात एका हिरोने जन्म घेतला. ज्याने मिळालेल्या संधीचं सोनं केलंय त्याचं नाव आहे सूरज चव्हाण… अख्खं घर म्हणतं त्याला गेम कळत नाही. पण या आठवड्यात फक्त सूरजचाच गेम दिसला. त्याने एकट्याने सगळ्यांना टफ फाईट दिली, असं रितेश देशमुख म्हणाला.

शेर अकेला…

झुंड में भेडिये आते हैं और शेर अकेला ही आता है…, असंही रितेश म्हणतो. सूरजच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कोणीही खेळू नका. सर्वांना समान न्याय मिळायला हवा. या घरातील सर्व सदस्य समान आहेत. सूरजने एकट्याने बाजी मारली आहे. त्याला कमी लेखू नका… अभिजीत धनंजय, पॅडी तुम्हाला नेहमी सांगतात की घाबरायचं नाही. जसं बोलताय बोला, जसं खेळताय खेळा…, असं रितेश म्हणालाय. यापुढे बिनधास्त खेळण्याचा सल्ला रितेशने सूरजला दिलाय.

सूरजच्या इतर मित्रांना रितेशने सल्ला दिला आहे. अंकिता, धनंजय आणि पॅडी यांना मला सांगायचं आहे की एकदा तुम्ही सूरजला गेम समजावला ना… मग आता त्याला खेळू द्या… त्याला तुम्ही मार्गदर्शन करा, पण कंट्रोल करू नका… महत्वाचं म्हणजे सूरजच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कोणीही खेळू नका, असं रितेश म्हणाला आहे.

अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार.
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला.
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg.
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा.
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला.