Bigg Boss 16 | टीना दत्ता आणि शालिन भनोट यांच्यावर सलमान खान चिडला…

बिग बाॅसच्या घरातील सदस्यांना आणि बाहेरील प्रेक्षकांना टीना आणि शालिन यांची मैत्री फेक असल्याचे दिसत आहे.

Bigg Boss 16 | टीना दत्ता आणि शालिन भनोट यांच्यावर सलमान खान चिडला...
| Updated on: Dec 02, 2022 | 8:06 PM

मुंबई : आजचा बिग बाॅसचा विकेंडचा वार जबरदस्त होणार आहे. आज सलमान खान टीना दत्ता आणि शालिन भनोट यांचा चांगलाच क्लास लावताना दिसणार आहे. नुकताच एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये दिसत आहे की, चाहते घरातील सदस्यांना प्रश्न विचारत आहेत. एकजण शालिनला म्हणतो की, तुझी आणि टीनाची मैत्री बाहेर फेक दिसत आहे. यावर शालिन म्हणाला की, आमचे काय रिलेशन आहे हे मी कोणाला का सांगावे? यावर सलमान खान भडकताना दिसतोय आणि थेट टीना आणि शालिनला चॅलेंज देतो.

बिग बाॅसच्या घरातील सदस्यांना आणि बाहेरील प्रेक्षकांना टीना आणि शालिन यांची मैत्री फेक असल्याचे दिसत आहे. यावरच चाहते टीना आणि शालिनला प्रश्न विचारताना दिसत आहेत. यावर टीना जे काही बोलते ते ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो.

बिग बाॅसच्या घरात राहण्यासाठी अनेकजण लव्ह अॅंगल तयार करताना दिसत आहेत. यामध्ये टीना दत्ता आणि शालिन भनोट देखील आहेत. बिग बाॅसच्या घरात प्रियंका आणि अंकित यांच्यामध्ये देखील वाद होताना दिसत आहेत.

नुकताच बिग बाॅसच्या घरात झालेल्या एका टास्कमध्ये शालिन आणि टीना चिटिंग करतात. जेंव्हा हा प्रकार निम्रतच्या लक्षात येतो. त्यावेळी शालिनला त्या फेरीमधून ती बाद करते. परंतू यावर शालिन निम्रतसोबत वाद घालताना दिसतो.

टास्कमध्ये अर्चना आणि सुंबुल यांच्यामध्ये मोठा वाद होतो. अर्चनाला सुंबुल हिने घेतलेला निर्णय अजिबात आवडला नाही. यामुळे सुंबुलला अनेक गोष्टी सुनावताना अर्चना दिसते. राणी बनण्यासाठी चेहरा सुंदर लागतो, असेही अर्चना सुंबुलला म्हणते.