‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ मालिकेत धमाकेदार वळण, संजय नार्वेकरांची होणार धडाकेबाज एंट्री!

स्टार प्रवाहवरील ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ (Tujhya Ishqacha Nadkhula) मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. लवकरच मालिकेत इन्सपेक्टर गौतम साळवी यांच्या रुपात सुप्रसिद्ध अभिनेते संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यांची एंट्री होणार आहे. बऱ्याच वर्षांनंतर ते मालिका विश्वात पदार्पण करणार आहेत.

‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ मालिकेत धमाकेदार वळण, संजय नार्वेकरांची होणार धडाकेबाज एंट्री!
संजय नार्वेकर

मुंबई : स्टार प्रवाहवरील ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ (Tujhya Ishqacha Nadkhula) मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. लवकरच मालिकेत इन्सपेक्टर गौतम साळवी यांच्या रुपात सुप्रसिद्ध अभिनेते संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यांची एंट्री होणार आहे. बऱ्याच वर्षांनंतर ते मालिका विश्वात पदार्पण करणार आहेत.

‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना संजय नार्वेकर म्हणाले, ‘नाटक आणि सिनेमामध्ये प्रेक्षकांनी मला पाहिलं आहे. मालिकेसाठी बराच वेळ द्यावा लागतो. सिनेमा आणि नाटक सुरु असल्यामुळे मला तो वेळ मालिकेसाठी देता आला नाही. मात्र आता सुवर्णयोग जुळून आलाय. व्यक्तिरेखा खूप छान आहे आणि वेळेचं गणितही जमून आलं आहे. कोणतंही पात्र साकारताना त्याला वेळ आणि योग्य न्याय देता आला पाहिजे असं मला वाटतं.’

डॅशिंग, जबाबदार आणि प्रामाणिक पोलिस अधिकारी!

‘इन्सपेक्टर गौतम साळवी हा एक डॅशिंग, जबाबदार आणि प्रामाणिक पोलिस अधिकारी आहे. पोलीस डिपार्टमेंटमध्ये त्याची जबर चर्चा आहे. मिश्किल आणि जिंदादील स्वभावाचा असा हा प्रामाणिक पोलिस अधिकारी. प्रत्येक गोष्टीचा ते बारकाईने आणि खोलात जाऊन अभ्यास करतात. पंचतंत्राच्या गोष्टींचा दाखला देत ते बोलतात. कितीही गंभीर केस असली तरी गौतमच्या सहवासात त्यांचं ओझं जाणवत नाही. माझ्या पद्धतीने मी या पात्रात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न करतो आहे’, अशी भावना संजय नार्वेकर यांनी व्यक्त केली.

स्वाती आणि रघूचं आयुष्य नव्या वळणावर!

गौतम साळवीच्या येण्याने मालिकेत नेमका काय धमाका होतो, याची गोष्ट पुढच्या भागांमधून उलगडेलच. पण स्वाती आणि रघूचं आयुष्य नव्या वळणावर येणार हे मात्र नक्की! गेले अनेक दिवस ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’या मालिकेची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. खूप कमी वेळात या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. महत्त्वाचं म्हणजे या मालिकेच्या कथेसोबतच यातील पात्रसुद्धा प्रेक्षकांचं मन जिंकत आहेत. त्यामुळे रघू आणि स्वातीचं फॅनफॉलोइंग आता मोठं झालंय.

(Sanjay Narvekar’s explosive entry in Tujhya Ishqacha Nadkhula serial)

हेही वाचा :

Nilu Phule Death Anniversary | एक असा खलनायक, जो एकही डॉयलॉग न बोलता, भय निर्माण करायचा

EXCLUSIVE : 100 पैकी 99 महिलांना ब्रा नको, त्यावर बोलणं धाडस कसलं? : हेमांगी कवी

‘विठ्ठल, विठ्ठल….’ सारेगमप लिटिल चॅम्प्समध्ये रंगणार विठू नामाचा गजर!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI