Shahaji Bapu Patil: काय हाटील, काय डोंगार, काय झाडीची अशीही भुरळ; ‘चला हवा येऊ द्या’मध्ये शहाजी बापू पाटील वोक्केत झळकणार

| Updated on: Jul 14, 2022 | 11:28 AM

थुकरटवाडीत शहाजी बापू पाटील हे कोणता नवीन डायलॉग मारतील आणि कोणते गौप्यस्फोट करतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर त्यांचा कधीही न पाहिलेला पैलूदेखील या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.

Shahaji Bapu Patil: काय हाटील, काय डोंगार, काय झाडीची अशीही भुरळ; चला हवा येऊ द्यामध्ये शहाजी बापू पाटील वोक्केत झळकणार
'चला हवा येऊ द्या'मध्ये शहाजी बापू पाटील वोक्केत झळकणार
Image Credit source: Tv9
Follow us on

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं राजकीय बंड हे देशभरात चांगलंच चर्चेत होतं. या बंडादरम्यानच आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांची एक ऑडिओ क्लीप प्रचंड (Audio Clip) व्हायरल झाली. या ऑडिओ क्लीपमधील त्यांच्या ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’ या डायलॉगवर सोशल मीडियावर प्रचंड मीम्स व्हायरल झाले. इतकंच नव्हे तर त्यावर इन्स्टाग्रामवर रिल्सही बनू लागले. शिंदे गटातील सांगोल्याचे हे आमदार शहाजी बापू पाटील आता ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमात झळकणार आहेत. या एपिसोडचं शूटिंग नुकतंच मुंबईतील स्टुडिओत पार पडलं. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत यावेळी त्यांच्या पत्नी रेखाताई पाटीलसुद्धा उपस्थित होत्या. या शूटिंगदरम्यानचे फोटो समोर आले असून प्रेक्षकांमध्ये या एपिसोडची उत्सुकता निर्माण झाली आहे.

थुकरटवाडीत शहाजी बापू पाटील हे कोणता नवीन डायलॉग मारतील आणि कोणते गौप्यस्फोट करतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर त्यांचा कधीही न पाहिलेला पैलूदेखील या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. पुढील आठवड्यात हा एपिसोड प्रसारित होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

शहाजी बापू पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात आणि या मतदारसंघाची ओळख दुष्काळी भाग म्हणून आहे. त्यामुळे आसाममधील झाडी आणि डोंगर पाहून शहाजी बापूंना आनंद झाल्यास नवल नाही. शहाजी बापू पाटील हे पहिल्यांदा आमदार म्हणून 1995 मध्ये विधानसभेवर निवडून आले. मात्र त्यावेळी ते काँग्रेस पक्षात होते आणि सत्ता आली ती शिवसेना आणि भाजपची. त्यामुळे त्यांना विरोधी बाकावर बसावं लागलं होतं. असं असतानाही त्यांनी जनतेची अनेक कामं केली. आता शहाजी बापू हे सांगोला तालुक्याचे आमदार आहेत.