Video | कॉमेडियन सुनील ग्रोव्हर याच्यावर शेंगा विकण्याची वेळ? व्हिडीओ पाहून चाहते हैराण

इतकेच नाही तर सोशल मीडियावर अनेक मजेदार पोस्ट शेअर करून चाहत्यांचे मनोरंजन करतो.

Video | कॉमेडियन सुनील ग्रोव्हर याच्यावर शेंगा विकण्याची वेळ? व्हिडीओ पाहून चाहते हैराण
| Updated on: Nov 15, 2022 | 7:58 PM

मुंबई : सुनील ग्रोव्हरने आपल्या कॉमेडीच्या जोरावर प्रसिध्दी मिळवली आहे. सुनीलचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे. सुनील आपल्या चाहत्यांसाठी कायमच सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करतो. इतकेच नाही तर सोशल मीडियावर अनेक मजेदार पोस्ट शेअर करून चाहत्यांचे मनोरंजन करतो. नुकताच सुनील ग्रोव्हरने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. जो आता तूफान व्हायरल होताना दिसत आहे. मात्र, हा व्हिडीओ पाहून सुनीलचे चाहते चिंतेत असून कमेंट करत सुनीलला अनेक प्रश्न विचारत आहेत.

सुनील ग्रोव्हरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, सुनील एका भुईमुगाच्या शेंगाच्या दुकानात जातो. त्यानंतर तो तिथे भुईमुगाच्या शेंगा भाजतो. हे दुकान रोडच्याकडेला आहे. हा व्हिडीओ बघितल्यावर अनेकांना हे कळाले नाही की, सुनील नेमके हे काय करतोय. विशेष म्हणजे सुनीलच्या चाहत्यांना हा प्रश्न पडलाय की, हे दुकान नेमके कोणाचे आहे. सुनीलने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना लिहिले की, खा… खा… खा…

सुनीलचा हा व्हिडीओ पाहून त्याचे चाहते हैराण झाले आहेत. नेमक्या कोणत्या कारणामुळे सुनील रस्त्याच्याकडेला बसून हे काम करत आहे हे चाहत्यांना कळत नाहीये. या व्हिडीओवर कमेंट करत एका चाहत्याने म्हटले आहे की, इतके वाईट दिवस आले का? तुझ्यावर, तुझ्याकडे काम नसल्यामुळे तू हे काम करत आहेस का? दुसऱ्याने लिहिले की, भाऊ आता चाहते तुम्हाला कॉमेडी करताना पाहण्यास इच्छुक आहेत, अजून किती वाट पाहावी लागणार आहे…

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us