‘आमिर खान’ला 500 रुपये ट्रान्सफर करा म्हणत मानव विज याने फटकारले, बायकॉट ट्रेंडवर केले मोठे भाष्य

लाल सिंह चढ्ढा बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला असला तरी देखील चित्रपटाला ओटीटीवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय

'आमिर खान'ला 500 रुपये ट्रान्सफर करा म्हणत मानव विज याने फटकारले, बायकॉट ट्रेंडवर केले मोठे भाष्य
Follow us
| Updated on: Nov 15, 2022 | 6:53 PM

मुंबई : ‘लाल सिंह चढ्ढा’ चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर आणि नंतर आमिर खान चर्चेत राहिला. या चित्रपटाकडून आमिर खानला प्रचंड अशा अपेक्षा होत्या. प्रत्यक्षात या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. यामुळे हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला. इतकेच नव्हे तर चित्रपटाची रिलीज डेट जाहिर झाल्यापासूनच सोशल मीडियावर चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मोहिम सुरू होती आणि याचाच तोटा चित्रपटाला झाल्याचे सांगितले जात होते. आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झालाय. ओटीटीवर या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे.

लाल सिंह चढ्ढा बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला असला तरी देखील चित्रपटाला ओटीटीवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. यावर बोलताना लाल सिंह चढ्ढा चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणारा अभिनेता मानव विज याने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, नेटफ्लिक्सवर चित्रपट बघितल्यानंतर लोक मेसेज करून माफी मागत आहेत. फक्त सोशल मीडियावरील बहिष्काराचा ट्रेंड पाहून आम्ही थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघितला नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

मानव विज म्हणाला की, मी असा लोकांना म्हणालो तुमच्यामुळे चित्रपट निर्मात्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागलाय. यामुळे तुम्ही आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसच्या खात्यामध्ये प्रत्येकी 500 रुपये ट्रान्सफर करा. कारण या तुमच्या ट्रेंडमुळे चित्रपट निर्मात्यांचे अत्यंत मोठे नुकसान झाले आहे. लोकांच्या मुर्खपणामुळे खूप जास्त नुकसान झाले आहे. बायकॉट ट्रेंडमुळे लोक दिशाहीन होतात. ट्विटरवर लोक माफी मागत असल्याचे देखील मानन विजने सांगितले.

Non Stop LIVE Update
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.