AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माफ करा, अंदाज चुकला, दुष्काळ पडणार! पंजाबराव डखांनी मागितली जाहीर माफी

Panjabrao dakh apology : प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डखांनी एका पोस्टमधून शेतकरी बांधवांची माफी मागितली आहे. पंजाबराव हवामानाचा अंदाज वर्तवण्यात कधीही चूकत नाहीत, अशा प्रकारचा विश्वास शेतकऱ्यांना त्यांच्यावर होता. पण या पोस्टनंतर ते चांगलेच चर्चेत आले आहेत.

माफ करा, अंदाज चुकला, दुष्काळ पडणार! पंजाबराव डखांनी मागितली जाहीर माफी
panjabrao dakh apologyImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 27, 2026 | 8:35 PM
Share

राज्यातल्या शेतकऱ्यांनी ज्यांच्यावर हवामान तज्ज्ञ म्हणून भरोसा टाकला. त्यांनीच आता राज्यात दुष्काळ पडणार असल्याचं मान्य केलं आहे. मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्यातील हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्यात प्रसिद्ध असणारे पंजाबराव डखांनी सोशल मीडियावरुन एका पोस्टच्या माध्यमातून यंदा राज्यात दुष्काळ पडणार असल्याचे सांगितले आहे. एवढच नाही तर त्यांनी आपण 2026मध्ये सांगितलेले सगळे अंदाज चुकल्याबद्दल माफीही मागितली आहे. “माफ करा 2026 मध्ये अंदाज चुकला, राज्यात दुष्काळ पडणार”, असं थेट म्हणाले आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गालाही धक्का बसला आहे. यावरुन शेतकऱ्यांनीही त्यांना सोशल मीडियावर घेरलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने 75 टक्के राज्यात दुष्काळ जाहीर केला आहे. त्यासाठी मोठी मदतप्रणाली कामाला लागली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातून पावसाने दडी मारली होती. शेतकऱ्यांनी पिक पेरणी करुन ठेवली होती. पाण्याअभावी पिकं करपून जात होती. त्या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे.

दरम्यान, राज्यात पावसाळा सुरु झाल्यापासून शेतकऱ्यांसह इतरही नागरिक हवामान विभागाच्या आणि इतरही हवामान तज्ज्ञांच्या अंदाजांवर लक्ष ठेऊन असतात. त्यांच्या भरवशावर राहून आपले शेतीचे नियोजन करण्यात येते. कधकधी तर स्वतः राज्य सरकारही याबाबत आवाहन करताना दिसून येते. पण यंदा शेतकरी राजावर खूपच वाईट वेळ येऊन ठेपलेली पाहायला मिळाली. मुख्यमंत्री राज्यात दौरा करताना दिसून आले होते. त्यावेळी शेतकऱ्यांना त्यांची अवस्था सांगताना अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले होते.

दरम्यान, पंजाबराव डख यांच्यावर सदरील पोस्टनंतर टीका होत आहे. “साहेब तुमच्या भरवश्यावर राहून आख्खा महाराष्ट्र आडवा झाला पावसाचा 1 थेंब पडला नाही आणि तुम्ही तारखावर तारखा देत राहिले आता बास करा, असा जळजळीत प्रहार एका शेतकऱ्याने त्यांच्यावर कमेंटमधून केला आहे.

तर दुसऱ्या एकाने असं लिहिलं आहे की “पहिले पासून सगळे न्यूजवाले सांगत होते की, यावर्षी पाऊस कमी येणार आहे पण तुम्ही प्रत्येकवेळी आज पाऊस येणार, उद्या येणार, इकडे वादळ फिरले, तिकडून कमी दाबाचा पट्टा तयार झाला असं सांगत होता. यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने कमीत कमी 50 हजार रुपये खर्च केले आहे. तुम्ही हेच दोन महिन्यांपूर्वी सांगायला हवं होतं, कमीत कमी खताचे पैसे तरी वाचले असते.”

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल