TMKOC: ‘तारक मेहता..’मध्ये ‘नट्टू काका’ परतले; या कलाकाराला मिळाली ऑफर

अभिनेते घनश्याम नायक (Ghanshyam Nayak) यांचं गेल्या वर्षी कर्करोगाने निधन झालं. घनश्याम यांनी बरीच वर्षे मालिकेत नट्टू काकाची भूमिका साकारली होती. त्यांच्या निधनानंतर नट्टू काकाच्या भूमिकेत दुसरा कुठला कलाकार आणण्याचा विचार नाही, असं निर्मात्यांनी यापूर्वी सांगितलं होतं.

TMKOC: 'तारक मेहता..'मध्ये 'नट्टू काका' परतले; या कलाकाराला मिळाली ऑफर
Ghanshyam Nayak
Image Credit source: Twitter
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Jul 01, 2022 | 3:07 PM

छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) नट्टू काकाची (Nattu Kaka) भूमिका साकारणारे अभिनेते घनश्याम नायक (Ghanshyam Nayak) यांचं गेल्या वर्षी कर्करोगाने निधन झालं. घनश्याम यांनी बरीच वर्षे मालिकेत नट्टू काकाची भूमिका साकारली होती. त्यांच्या निधनानंतर नट्टू काकाच्या भूमिकेत दुसरा कुठला कलाकार आणण्याचा विचार नाही, असं निर्मात्यांनी यापूर्वी सांगितलं होतं. मात्र आता मालिकेत नट्टू काकांच्या भूमिकेत एक कलाकार पहायला मिळणार आहे. अभिनेते किरण भट्ट ही भूमिका साकारणार आहेत. ‘तारक मेहता..’च्या अधिकृत यूट्यूब पेजवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये निर्माते असित कुमार मोदी म्हणाले, “घनश्याम नायक यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. परंतु ‘शो मस्ट गो ऑन’ या म्हणीप्रमाणे आम्ही नव्या कलाकाराला ती भूमिका दिली आहे. मला आशा आहे की प्रेक्षक किरण यांनासुद्धा तितकंच प्रेम देतील.”

या व्हिडीओच्या सुरुवातीला असित कुमार मोदी हे जेठालाल (दिलीप जोशी) यांच्या मालकीच्या दुकानात गडा इलेक्ट्रॉनिक्समध्ये प्रवेश करतात. काही जुन्या क्लिप्समधून प्रेक्षकांना दुकानातील घनश्याम यांची झलक पहायला मिळते. त्यानंतर निर्माते म्हणतात, “नट्टू काकांनाही गडा इलेक्ट्रॉनिक्समध्ये घडणारी सर्व कॉमेडी नक्कीच आठवत असेल आणि ते वरून हसत असतील.” त्यानंतर ते कॅमेऱ्याकडे पाहून हसत हसत किरण यांचं हात जोडून स्वागत करतात.

“प्रत्येक कलाकार फक्त प्रेमाच्या शोधात असतो आणि तुम्ही सर्वांनी नेहमीच आमच्या मालिकेवर भरपूर प्रेमाचा वर्षाव केला आहे. आम्ही फक्त एक छोटेसे एंटरटेनर होतो आणि तुमच्या प्रेमामुळेच आम्ही खूप काही मिळवलं आहे. आता माझी एकच विनंती आहे की तुम्ही नवीन नट्टू काकांना खूप प्रेम द्या. आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमा करा. मला विश्वास आहे की ते तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण करतील. अभिनेते बदलत राहतील, काही निघून जातील, काही मालिका सोडतील, पण पात्र कायम राहतील. शो चालूच राहिला पाहिजे,” असं असित कुमार मोदी म्हणाले.

मालिकेत नवीन दयाबेन येण्याबद्दलसुद्धा निर्माते इशारा देत आहेत, असाही अंदाज नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून वर्तवला आहे. अभिनेत्री दिशा वकनीने 2017 मध्ये बाळाला जन्म दिल्यानंतर शोमधून ब्रेक घेतला होता. तेव्हापासून ती मालिकेत परतलीच नाही. आता दयाबेनच्या भूमिकेत कोणती नवी कलाकार येणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

हे सुद्धा वाचा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें