Alia Bhatt: आलिया भट्ट प्रेग्नंट असल्याची बातमी Reddit युजरने 2 महिन्यांपूर्वीच दिली होती; पण..

या युजरने आलिया भट्टच्या लग्नानंतर अवघ्या 4 दिवसांनंतर बॉलिवूड न्यूज आणि गॉसिप फोरमवर लिहिलं होतं की आलिया भट्ट प्रेग्नंट आहे. तिच्या एका मित्राकडून, मेकअप आर्टिस्टकडून ही गोष्ट लीक झाल्याचं तिने म्हटलं होतं.

Alia Bhatt: आलिया भट्ट प्रेग्नंट असल्याची बातमी Reddit युजरने 2 महिन्यांपूर्वीच दिली होती; पण..
Alia Bhatt
Image Credit source: Instagram
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Jul 01, 2022 | 2:15 PM

आलिया भट्टने (Alia Bhatt) नुकतीच तिच्या गरोदरपणाची (Alia Bhatt Pregnant) बातमी जाहीर केली. अल्ट्रासाऊंड करतानाचा फोटो पोस्ट करत आलियाने चाहत्यांना ही गुड न्यूज दिली. सोशल मीडियावर तिची जोरदार चर्चा सुरू असतानाच एका रेडिट (Reddit) युजरने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या युजरने आलिया भट्टच्या लग्नानंतर अवघ्या 4 दिवसांनंतर बॉलिवूड न्यूज आणि गॉसिप फोरमवर लिहिलं होतं की आलिया भट्ट प्रेग्नंट आहे. तिच्या एका मित्राकडून, मेकअप आर्टिस्टकडून ही गोष्ट लीक झाल्याचं तिने म्हटलं होतं. या पोस्टनंतर संबंधित युजरवर बंदी घालण्यात आली होती. आता जेव्हा आलियाने 2 महिन्यांनंतर गरोदर असल्याचं जाहीर केलं, तेव्हा तिच्या अकाऊंटवरील बंदी उठवण्यात आली आहे.

18 एप्रिल रोजी reddit फोरमवर newbee_forfun नावाच्या या युजरने लिहिलं होतं की, मिस भट्ट गरोदर असल्याचं कळतंय. मला एका मेकअप आर्टिस्ट असलेल्या मित्राकडून ही बातमी समजली आहे. या पोस्टनंतर संबंधित युजरवर थेट बंदी घालण्यात आली होती. त्यावर अनेकांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या आणि ती निराधार अफवा पसरवत असल्याचं म्हटलं होतं. आता आलिया प्रेग्नंट असल्याची बातमी समोर आल्यानंतर त्या युजरला फोरमवर पुन्हा आणलं आहे.

हीच ती पोस्ट-

‘माझ्यावरील बंदी काढल्याबद्दल धन्यवाद. तसंच आलियाच्या गरोदर असल्याच्या वृत्तासाठी मला श्रेय दिल्याबद्दल धन्यवाद’, असं तिने फोरमवर परत येताच लिहिलं. ‘काही असो, त्यावेळी लोकांना ते खरं वाटलं नाही. पण माझी बातमी खरी होती. आता मला त्याबद्दल अधिक माहिती विचारू नका. जेव्हा मला त्याबाबत अधिक माहिती मिळेल तेव्हा मी सांगेन’, असंही ती म्हणाली.

आलिया सध्या तिच्या हॉलिवूडच्या चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त परदेशी गेली आहे. सोमवारी तिने प्रेग्नंसीबाबतची पोस्ट शेअर करताच प्रियांका चोप्रा, करण जोहर, टायगर श्रॉफ, इशान खट्टर, वाणी कपूर, फरहान अख्तर, मलायका अरोरा, अनिल कपूर, बिपाशा बासू, आकांक्षा रंजन, शशांक खैतान, इशा गुप्ता, रकुल प्रीत सिंग, परिणीती चोप्रा यांसारख्या सेलिब्रिटींकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें