Tejasswi Prakash | करण कुंद्रासोबतच्या लग्नाबाबत तेजस्वीने शेअर केली खास पोस्ट

करण कुंद्रा आणि तेजस्वीच्या चाहत्यांना या दोघांची जोडी आवडते. मध्यंतरी बातम्या आल्या होत्या की, करण आणि तेजस्वी लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत.

Tejasswi Prakash | करण कुंद्रासोबतच्या लग्नाबाबत तेजस्वीने शेअर केली खास पोस्ट
| Updated on: Oct 04, 2022 | 11:40 AM

मुंबई : बिग बॉस 15 च्या सीजनमध्ये बिग बॉसपेक्षाही अधिक कोण चर्चेत असेल तर तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आणि करण कुंद्राची जोडी…करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांचे सुत बिग बॉसच्या घरातच जुळलंय. तेजस्वी प्रकाश तिच्या बिनधास्तपणामुळे कायम लाइमलाइटमध्ये असते. तेजस्वी ही बिग बॉस 15 (Bigg Boss 15) ची विजेती देखील आहे. करण कुंद्रा आणि तेजस्वीच्या चाहत्यांना त्यांची केमिस्ट्री प्रचंड आवडते. दोघेही नेहमीसोबत स्पाॅट होतात. इतकेच नाही तर तेजस्वीचा वाढदिवस (Birthday) साजरा करण्यासाठी ते दोघे गोव्याला पोहचले होते.

इथे पाहा तेजस्वी प्रकाशने शेअर केलेली पोस्ट

करण कुंद्रा आणि तेजस्वीच्या चाहत्यांना या दोघांची जोडी खूप आवडतंय. मध्यंतरी बातम्या आल्या होत्या की, करण आणि तेजस्वी लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. तेजस्वी काही दिवसांपूर्वी तिच्या आईसोबत आणि करण कुंद्राच्या आईसोबत शाॅपिंग करण्यासाठी गेली होती. चाहत्यांना आता करण आणि तेजस्वीच्या लग्नाचे वेध लागल्याचे दिसत आहे. यामुळे तेजस्वीला करणसोबत लग्न कधी करणार हा प्रश्न विचारला जातोय.

तेजस्वीला करणसोबत लग्न कधी करणार हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. आता यावर उत्तर देत थेट तेजस्वीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. विशेष म्हणजे तेजस्वीने हा व्हिडीओ शेअर करताना करण कुंद्राला देखील टॅग केलाय. तेजस्वीने जणू लग्न कधी करणार हे विचारणाऱ्यांना उत्तरच दिलंय. ‘सॉरी’ पेक्षा ‘शुअर’ हे नेहमीच चांगले असते. हे विशेषतः सर्व मुलींसाठी आहे. काही गोष्टींसाठी वेळ घ्या…

यासोबतच तेजस्वीने एक व्हिडीओ शेअर केला असून व्हिडीओवर टॅक्स्टमध्ये लिहिले आहे की, शाही कब होगी? तेजस्वीचा हा खास व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. तेजस्वीने या व्हिडीओच्या माध्यमातून सरळ सरळ हे सांगण्याचा प्रयत्न केलाय की, जोपर्यंत तुम्ही शुअर होत नाहीत, तोपर्यंत लग्न करू नका. तेजाचा हा खास व्हिडीओ तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.