Tu Tevha Tashi: कॉलेज रियुनियन ठरणार निर्णायक; सौरभ अनामिकासमोर व्यक्त करणार प्रेम?

दुसरीकडे वल्ली या रियुनियनला पोहोचते आणि सौरभ अनामिकासमोर त्याच्या मनातील गोष्ट बोलू नये यासाठी तिचे प्रयत्न सुरू होतात. ती सौरभला गुंगीचं औषध देते.

Tu Tevha Tashi: कॉलेज रियुनियन ठरणार निर्णायक; सौरभ अनामिकासमोर व्यक्त करणार प्रेम?
Tu Tevha Tashi
Image Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Jun 01, 2022 | 8:15 AM

झी मराठी वाहिनीवरील ‘तू तेव्हा तशी’ (Tu Tevha Tashi) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची आवडती ठरली. ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे. सौरभच्या (Swwapnil Joshi) मनातील भावना तो अनामिकासमोर व्यक्त करू शकेल का, कॉलेजचं रियुनियन त्यासाठी निर्णायक ठरू शकेल का हे आता प्रेक्षकांना पुढील भागात पहायला मिळणार आहे. या रियुनियनची सध्या जोरदार तयारी चालू असल्याचं प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळतेय. सौरभ अनामिकाला (Shilpa Tulaskar) अजुन काही क्लू देतो. अनामिका काही त्या मुलीला ओळखू शकत नाही. सौरभ या सगळ्याचा आनंद घेत आहे. प्रेक्षक मालिकेत आता पुढे पाहू शकतील की रियुनियनचा दिवस येतो. सगळे मित्र अनेक वर्षांनंतर भेटतात. प्रत्येक मुलीमध्ये अनामिका तिला शोधण्याचा प्रयत्न करते. पण तिला यश मिळत नाही.

दुसरीकडे वल्ली या रियुनियनला पोहोचते आणि सौरभ अनामिकासमोर त्याच्या मनातील गोष्ट बोलू नये यासाठी तिचे प्रयत्न सुरू होतात. ती सौरभला गुंगीचं औषध देते. त्या औषधाचा परिणाम काही काळ राहतो पण सौरभ अनामिकासमोर त्याच्या मनातील भावना बोलून दाखवतो. ती मुलगी अनामिकाच आहे हे अनामिकाला कळणार आहे पण अनामिका सौरभच्या भावनांचा स्वीकार करेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

पहा मालिकेचा प्रोमो-

20 मार्चपासून रात्री ८ वाजता झी मराठी वाहिनीवर ही मालिका प्रसारित होत आहे. अभिनेता स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर ही जोडी पहिल्यांदाच या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. स्वप्नील यात सौरभ तर शिल्पा अनामिका दीक्षितची भूमिका साकारत आहे. या दोघांसोबत छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावेसुद्धा यामध्ये भूमिका साकारतेय.