बिग बॉसच्या घरात असतानाच सूरज चव्हाणला मोठी ऑफर

Suraj Chavan Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या या सिझनमधील स्पर्धक सूरज चव्हाण सध्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असतो. आता बिग बॉस मराठीच्या घरात असतानाच त्याला मोठी ऑफर देण्यात आली आहे. लवकरच त्याचा हा प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वाचा सविस्तर...

बिग बॉसच्या घरात असतानाच सूरज चव्हाणला मोठी ऑफर
सूरज चव्हाण
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 09, 2024 | 7:21 PM

‘बिग बॉस मराठी’ चा हा नवा सिझन सध्या प्रचंड गाजतोय. या घरातील प्रत्येक सदस्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. असाच एक सदस्य म्हणजे सूरज चव्हाण… सामन्य घरातून येणारा सूरज चव्हाण हा सध्या प्रचंड चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात असतानाच सूरज चव्हाणला एक मोठी ऑफर देण्यात आली आहे. सूरजला नव्या गाण्याची ऑफर दिली गेली आहे. गणपती विशेष भागात गायक अभिनेता उत्कर्ष शिंदे हजेरी लावणार आहे. यावेळी त्ययाने सूरजला मोठी ऑफर देऊ केली आहे.

सूरज चव्हाणचं नवं गाणं येणार

सूरज चव्हाणला नव्या गाण्याची ऑफर उत्कर्ष शिंदेने दिली आहे. शिंदेशाही परिवार तुझ्यासाठी एक गाणं बनवेल. माझे बाबा आनंद शिंदे ते गाणं गातील आणि तू त्यात अभिनय करशील, असं उत्कर्षने यावेळी सूरजला म्हटलं. उत्कर्ष शिंदे कायमच सूरजला सपोर्ट करताना दिसतो. आता त्याने सूरजला नव्या गाण्याची ऑफर दिली आहे.

स्पर्धकांना मिळणार गिफ्ट्स

‘बिग बॉस मराठी’मध्ये सध्या गणेशोत्सव स्पेशल एपिसोड दाखवला जात आहे. अंकिता प्रभू वालावकर, पॅडी कांबळे अशी कोकणातील मंडळीही बिग बॉस मराठीच्या घरात आहेत आणि यंदाचे गणपती त्यांचे चुकलेत. अंकिताने अनेकदा याबद्दल तिची नाराजीही व्यक्त केली आहे. अशातच आज बिग बॉस मराठी सार्वजनिक गणेसोत्सव मंडळात सदस्यांना स्पेशल गिफ्ट्स दिले जाणार आहेत. उत्कर्ष शिंदे हा देखील याआधी बिग बॉसच्या घरातील स्पर्धक होता. त्याच्या येण्याने या नव्या सिझनमध्ये ऊर्जा आली आहे.

बिग बॉस मराठीच्या गणपती विशेष भागात उत्कर्ष शिंदे हजेरी लावणार आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये उत्कर्ष शिंदे सदस्यांना म्हणतोय,”भाऊंनी तुमच्यासाठी काही स्पेशल गिफ्ट्स पाठवले आहेत”. घरातील गणपती बाप्पाचा फोटो पाहून सदस्यांना अश्रू अनावर झालेले पाहायला मिळत आहेत. अंकिता, वैभव, जान्हवी, डीपी यांच्यासाठी रितेश भाऊने खास गिफ्ट्स दिले आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या कालच्या भागात घन:श्याम दरवडे घराबाहेर पडला. अंकिताचे या एपिसोडमध्ये विशेष कौतुक झाले, शिवाय निक्कीला कधीही कॅप्टन होता येणार नाही अशी शिक्षाही मिळाली आहे. आता आजच्या भागात काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.