
मुंबई : कुंडली भाग्य मालिकेमधील प्रीता अर्थात श्रद्धा आर्या कायमच चर्चेत असते. साधारण एका वर्षापूर्वी श्रद्धा लग्न बंधणात अडकली. कुंडली भाग्य मालिकेमध्ये अत्यंत शांत असलेली प्रीता रिअल लाईफमध्ये खूप जास्त फनी आहे. श्रद्धा आपल्या चाहत्यांसाठी कायमच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. श्रद्धा लग्न करणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर सर्वांना वाटले की, श्रद्धा एखाद्या टीव्ही अभिनेत्यासोबत लग्न करणार आहे. परंतू सर्वांना धक्का देत श्रद्धाने एका नौदल अधिकाऱ्यासोबत लग्न केले.
श्रद्धा आणि राहुलची प्रेमकहाणी खूप रोमँटिक आहे. श्रद्धाच्या पतीचे नाव राहुल नागल आहे आणि तो नौदललामध्ये अधिकारी आहे. नुकताच श्रद्धाने राहुलसोबतचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
श्रद्धाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तिला आपल्या पतीकडून तारीफ ऐकून घ्यायची आहे आणि त्याचा व्हिडीओ श्रद्धा काढत आहे. गाणे सुरू होते. तारीफ करोगे कब तक…हा तब तक पण यादरम्यान श्रद्धाचा पती काहीच रिप्लाय करत नाही.
पतीचा काही रिप्लाय येत नसल्याने श्रद्धा त्याला मजाकमध्ये मारते. त्यानंतर श्रद्धाचा पती भीतीने तारीफ करताना दिसत आहे. हा एक फनी व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये श्रद्धा आणि राहुल हे समुद्रकिनाऱ्यावर बसलेले दिसत आहेत.
श्रद्धाने हे रील तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. हा व्हिडीओ श्रद्धाच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. चाहते श्रद्धाच्या या व्हिडीओवर विविध कमेंट करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल देखील होतोय.
या व्हिडीओमध्ये श्रद्धाने काळा गॉगल आणि पांढर्या रंगाची मिडी घातली आहे. तिच्या पतीने पांढरा शर्ट आणि शॉर्ट घातल्याचे दिसत आहे. श्रद्धा कायमच राहुलसोबत विविध प्रकारचे रील तयार करून सोशल मीडियावर शेअर करते.