Thank God: अक्षयसमोर फिकी पडली अजय देवगणची जादू; ‘थँक गॉड’ची कमाई जेमतेम

| Updated on: Oct 26, 2022 | 1:57 PM

वीकेंड ठरवणार 'राम सेतू', 'थँक गॉड'चं नशीब; कोण मारणार बाजी?

Thank God: अक्षयसमोर फिकी पडली अजय देवगणची जादू; थँक गॉडची कमाई जेमतेम
Thank God Movie
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई- अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘थँक गॉड’ (Thank God) हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वी या चित्रपटावरून बराच वाद सुरू होता. कायदेशीर अडचणींना पार करत अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र पहिल्या दिवशी ग्रँड ओपनिंग करण्यात अजयच्या या चित्रपटाला यश मिळालं नाही. मंगळवारी ‘थँक गॉड’ने ठीकठाक कमाई केली. याच दिवशी अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ (Ram Setu) हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या दोन मोठ्या कलाकारांच्या चित्रपटांची टक्कर पहायला मिळत आहे.

अक्षयच्या राम सेतूने पहिल्या दिवशी जवळपास 15 कोटींचा गल्ला जमवला. तर थँक गॉडने 8.10 कोटी रुपयांची कमाई केली. थँक गॉडचे सर्वाधिक 664 शोज दिल्ली एनसीआरमध्ये प्रदर्शित झाले. मात्र यातून फक्त 19.50 टक्केच कमाई होऊ शकली. या तुलनेत मुंबईत जास्त कमाई झाली.

हे सुद्धा वाचा

मुंबई या चित्रपटाचे 547 शोज चालवण्यात आले होते. त्यातून 24.75 टक्क्यांची कमाई झाली. तर पुणे, बेंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद या शहरांमध्येही चित्रपटाचा ठीकठाक प्रतिसाद मिळाला.

थँक गॉड हा एक फँटसी ड्रामा चित्रपट आहे. इंद्र कुमार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. यामध्ये अजय देवगणने चित्रगुप्तची भूमिका साकारली आहे. तर सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत सिंह यांनी ऑनस्क्रीन पती-पत्नीची भूमिका साकारली आहे. ‘व्हॉट गोज अराऊंड’ या दानिश चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे.

अजय देवगणच्या या चित्रपटाला अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’कडून चांगली टक्कर मिळणार आहे. त्यामुळे येत्या दिवसांत कमाईत कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.