Thank God: ‘थँक गॉडचे’ मधील ‘माणिक मागे हिते’ गाणे रिलीज , सिद्धार्थ- नोराच्या केमिस्ट्रीने वाढले हार्टबीट्स

| Updated on: Sep 16, 2022 | 4:34 PM

नोरा-सिद्धार्थचे हे गाणे लोकांना पसंतीस उतरत आहे. गाण्यात योहानीच्या आवाजाचे खूप कौतुक केले जात आहे. योहानी ही श्रीलंकेची गायिका आहे. सोशल मीडियावर  योहानीचा आवाज आणि नोराच्या डान्सला चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवताना दिसत आहे.

Thank God: थँक गॉडचे मधील माणिक मागे हिते गाणे रिलीज ,  सिद्धार्थ- नोराच्या केमिस्ट्रीने वाढले हार्टबीट्स
Thank God
Image Credit source: Instagram
Follow us on

सिद्धार्थ मल्होत्राचा आगामी चित्रपट ‘थँक गॉड’ (Thank God) नकारात्मक कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. दरम्यान, या चित्रपटाचे पहिले गाणे आज रिलीज झाले आहे. हे गाणे योहानीच्या लोकप्रिय गाण्याचे ‘मनिके’ गाण्याचा रीमेक आहे. या गाण्यात सिद्धार्थसोबत नोरा (sidhaarth -nora)देखील आहे. ती तिच्या मोहक नृत्याने सिद्धार्थला आकर्षित करताना दिसत आहे. सोशल मीडियावर  योहानीचा आवाज आणि नोराच्या डान्सला (Dance)चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवताना दिसत आहे.

सोशल मीडियावर धुमाकूळ

अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्या थँक गॉड या चित्रपटातील पहिले गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्यामध्ये अजय देवगणही सुरुवातीला दाखवला आहे. चित्रपटात तो चित्रगुप्त झाला आहे. तो सिद्धार्थला दाखवतो, की वासना प्रत्येक माणसामध्ये असते आणि ती नियंत्रित करावी लागते.
यामध्ये नोरा पांढऱ्या रंगाच्या आउटफीट मध्ये दिसत आहे. नोरा-सिद्धार्थचे हे गाणे लोकांना पसंतीस उतरत आहे. गाण्यात योहानीच्या आवाजाचे खूप कौतुक केले जात आहे. योहानी ही श्रीलंकेची गायिका आहे.

हे सुद्धा वाचा

 

2020 मध्ये तिचे ‘माणिक माझे हिते’ हे गाणे व्हायरल झाले होते. ते खूप लोकप्रिय झाले होते. या गाण्याचे हिंदी व्हर्जन तनिष्क बागचीने रिक्रिएट केले आहे. थँक गॉड या चित्रपटात रकुल प्रीतचीही भूमिका आहे. काही लोक या चित्रपटाला विरोध करत आहेत. यामध्ये हिंदू देवताविषयी चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचे लोकांचे म्हणणे आहे. अजय देवगण चित्रगुप्ताच्या भूमिकेत आहे. चित्रपटाचा ट्रेलर समोर आल्यानंतर लोकांनी याला विरोध केला.