
मुंबई : अभिनेता शाहिद कपूर हा कायमच चर्चेत असतो. शाहिद कपूर (Shahid Kapoor) याची सोशल मीडियावर तगडी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. शाहिद कपूर हा सोशल मीडियावर देखील कायमच सक्रिय असतो. काही दिवसांपूर्वीच आपली पत्नी मीरा राजपूत (Meera Rajput) हिला लग्नाच्या वाढदिवसाच्या खास प्रकारे शुभेच्छा देताना शाहिद कपूर हा दिसला. शाहिद कपूर याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. शाहिद कपूर हा नेहमीच त्याच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत असतो.
शाहिद कपूर हा मीरा राजपूत हिच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर बाॅलिवूड अभिनेत्री करिना कपूर हिला डेट करत होता. विशेष म्हणजे अनेक वर्षे यांनी एकमेकांना डेट केले. चाहते हे शाहिद कपूर आणि करिना कपूर यांच्या लग्नाची वाट देखील बघत होते. मात्र, अचानक यांचे ब्रेकअप झाले आणि दोघांचे रस्ते वेगवेगळे झाले. शाहिद कपूर हा करिना कपूरच्या आईला आवडत नसल्याचे सांगितले जाते.
नुकताच सध्या सोशल मीडियावर शाहिद कपूर याचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. शाहिद कपूर यांचा हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये भर रस्त्यामध्ये शाहिद कपूर याचा पारा चढल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी शाहिद कपूर याच्यासोबत त्याची पत्नी मीरा राजपूत ही देखील दिसत आहे.
शाहिद कपूर पापाराझी यांच्यावर भडकताना दिसत आहे. इतकेच नाही तर शाहिद कपूर याचे बोलणे ऐकून सर्वचजण हैराण झाल्याचे बघायला मिळाले. शाहिद कपूर आणि त्याची पत्नी एका नातेवाईच्या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी पापाराझी यांना फोटोसोठी पोझ देताना देखील शाहिद कपूर दिसला. पत्नीसोबतही फोटोसाठी शाहिद कपूर याने अगोदर पोझ दिल्या.
ज्यावेळी कार्यक्रमातून शाहिद कपूर हा बाहेर पडला. त्यावेळी पापाराझी त्याला आवाज देताना दिसले. हे शाहिद कपूर याला अजिबात आवडले नाही. शाहिद कपूर याने थेट म्हटले की पागलसारखे का ओरडत आहेत? मी इथेच उभा आहे ना? मग असे पागलसारखे का ओरडत आहेत. शाहिद कपूर याचे हे बोलणे अनेक लोकांना आवडले नसल्याचे दिसत आहे.
आता शाहिद कपूर याचा हाच व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. शाहिद कपूर याच्या या व्हिडीओवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच शाहिद कपूर याची पत्नी मीरा राजपूत हिने म्हटले होते की, मला स्टार किड्स या शब्दाची चिड येते. शाहिद कपूर याची पत्नी मीरा ही देखील सोशल मीडियावर सक्रिय दिसते.