पब्लिसिटीसाठी लोक कॅन्सरचाही… प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोठं विधान; पूनम आणि तिच्या आजारावर मोठा खुलासा

| Updated on: Feb 02, 2024 | 7:45 PM

अभिनेत्री पूनम पांडे हिच्या निधनाबाबत आता गूढ वाढताना सतत दिसतंय. पूनम पांडे हिच्या निधनानंतर विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. अनेकांनी तर थेट म्हटले आहे की, पूनम पांडे हिचे निधन म्हणजे फक्त आणि फक्त स्टंट आहे. आता यावर काही मोठे खुलासे होण्याची दाट शक्यता आहे.

पब्लिसिटीसाठी लोक कॅन्सरचाही... प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोठं विधान; पूनम आणि तिच्या आजारावर मोठा खुलासा
Follow us on

मुंबई : अभिनेत्री पूनम पांडे हिच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर आता पूनम पांडे हिच्या निधनाचे गूढ वाढताना दिसतंय. पूनम पांडे हिचा मृतदेह कुठे आहे आणि तिच्यावर अंत्यसंस्कार हे कुठे केले जाणार याबद्दल काहीच माहिती उपलब्ध नाहीये. फक्त हेच नाही तर पूनम पांडे हिच्या अख्या कुटुंबियांचे फोन देखील बंद आहेत. पूनम पांडे हिचे निधन हे गर्भाशयातील कॅन्सरने झाल्याचे तिच्या मॅनेजरकडून सांगण्यात आलंय. पूनम पांडे हिने शेवटचा श्वास मुंबईमध्ये घेतल्याचे अगोदर सांगितले गेले. त्यानंतर कानपूरमध्येच तिने शेवटचा श्वास घेतल्याचे सांगितले गेले.

पूनम पांडे हिच्यावर पुण्यामध्ये उपचार सुरू असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगितले गेले. मात्र, अजूनही पूनम पांडे हिच्या अंत्यसंस्कारबद्दल काहीच खुलासा करण्यात आला नाहीये. चाहत्यांनी पूनम पांडे हिच्या लोखंडवाला येथील इमारतीकडे धाव घेतली. मात्र, तिथे देखील कोणीही पूनम पांडे हिच्या निधनाबद्दल बोलण्यास तयार नाहीये.

खरोखखरच पूनम पांडे हिचे निधन झाले का? हा प्रश्न उपस्थित केला जातोय. आता नुकताच एका अभिनेत्रीच्या पोस्टमुळे विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. अभिनेत्री रोजलिन खान हिने लिहिले की, मी नुकताच डाॅक्टरांसोबत चर्चा केलीये. त्यांनी सांगितले की, गर्भाशयातील कॅन्सरवर उपचार होऊ शकतो आणि 60 टक्के गर्भाशयातील कॅन्सर बरा होतो.

पुढे रोजलिन खान हिने लिहिले की, मला माहिती नाही की, पूनमबद्दल जी बातमी आलीये ती खरी आहे की, खोटी. जर हे खोटे असेल तर स्टंट करण्यासाठी गर्भाशयातील कॅन्सरला उपयोग केला जातोय. भारतामधील तब्बल 2 कोटी लोक हे गर्भाशयातील कॅन्सरला लढा देत आहेत. हे जर खरे असेल तर ते लोक आतमधून तुटू शकतात.

तर प्लीज हा अशा गोष्टी करणे टाळावेच. गर्भाशयातील कॅन्सरमध्ये टर्मिनल स्टेजवर सुद्धा डाॅक्टर हे तुम्हाला वाचू शकतात. आता रोजलिन खान हिची ही पोस्ट पाहून असे वाटत आहे की, कदाचित पूनम पांडे हिचा हा स्टंट आहे. आता पुढील काही दिवसांमध्ये पूनम पांडे हिच्या या निधनाबद्दल काही मोठे खुलासे होण्याची दाट शक्यता आहे.