Bollywood | 3 दिवस बंद खोलीत होता अभिनेत्रीचा मृतदेह, कुटुंबियांनी नाही केले अंत्यसंस्कार

Bollywood | आजारी होती अभिनेत्री, आजारपणाला कंटाळून बॉयफ्रेंडने सोडली साथ? निधनानंतर दोन दिवस मृतदेह होता खोलीत, कुटुंबिय नाही तर कोणी केले अभिनेत्रीवर अत्यसंस्कार? झगमगत्या विश्वातील अनेक गोष्टी चाहत्यांच्या समोर येत असतात. त्यातील काही हैराण करणाऱ्या असतात.

Bollywood | 3 दिवस बंद खोलीत होता अभिनेत्रीचा मृतदेह, कुटुंबियांनी नाही केले अंत्यसंस्कार
| Updated on: Oct 03, 2023 | 2:18 PM

मुंबई | 03 ऑक्टोबर 2023 : तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली, प्रसिद्धी झोतात आली, प्रेमात पडली… पण तिला शेवटच्या क्षणी नाही मिळाली कोणाची साथ. गंभीर आजाराने ग्रस्त अभिनेत्रीच्या निधनाबद्दल देखील कोणाला कळलं नाही… तीन दिवस अभिनेत्रीचा मृतदेह बंद खोलीत होती. दुर्गंधी येवू लागल्यामुळे शेजारच्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.. तेव्हा अभिनेत्रीच्या निधनाने सर्वांना धक्का बसला. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री परवीन बाबी आहेत. आज परवीन बाबी यांच्या निधनाला अनेक वर्ष झाली आहेत. पण त्यांच्याबद्दल अनेक चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगत असतात. सध्या सर्वत्र परवीन बाबी यांच्या निधनाची चर्चा रंगली आहे.

एक काळ बॉलिवूड गाजवलेल्या अभिनेत्री परवीन बाबी यांच्या निधनाबद्दल आज सर्वांना माहिती आहे. परवीन बाबी एका गंभीर आजाराने ग्रस्त होत्या. २० जानेवारी २००५ मध्ये परवीन बाबी यांचं निधन झालं. धक्कादायक गोष्ट म्हणजे तीन दिवस त्यांच्या मृतदेह बंद खोलीत होता. चाहत्यांची संख्या मोठी असून देखील परवीन बाबी शेवटच्या क्षणी एकट्या होत्या.

परवीन बाबी मुंबई येथील जुहू येथील फ्लॅटमध्ये राहायच्या. परवीन बाबी यांच्या निधनानंतर तीन दिवसांनंतर त्यांच्या मृत्यूबद्दल सर्वांना कळलं. मिळालेल्या माहितीनूसार सतत मद्यपान, सिगरेट आणि वाईट सवयींमुळे त्यांचं मानसिक संतुलन ढासळलं. सिजोफ्रेनिया या गंभीर आजाराने परवीन बाबी यांना गाठलं.

सिजोफ्रेनिया या आजारासोबतच परवीन यांना मधुमेहचा देखील त्रास सुरु झाला. आजारामुळे परवीन बाबी सतत लोकांवर संशय घ्यायच्या. ज्यामुळे इंडस्ट्रीमध्ये अनेकांनी त्यांची साथ सोडली. धक्कादायक गोष्ट म्हणजे, शवविच्छेदनानंतर देखील परवीन बाबी यांच्या कुटुंबियांनी अभिनेत्रीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा परवीन बाबी यांच्या नावाची चर्चा दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यासोबत रंगली होती.

परवीन बाबी, महेश भट्ट यांच्यावर जीवापाड प्रेम करत होत्या. पण महेश भट्ट यांची देखील साथ त्यांना मिळाली नाही. अभिनेत्रीच्या आजारपणाला कंटाळून महेश भट्ट यांनी देखील त्यांची साथ सोडली असं देखील अनेकदा समोर आलं. पण शेवटच्या क्षण महेश भट्ट यांनीचं परवीन बाबी यांच्यावर अंत्यसंस्कार केले.