
मनोरंजन विश्वातून खळबळजनक बातमी समोर येत आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. त्याने वयाच्या ५४व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या अकस्मात निधनाने सर्वांना धक्का बसला आहे. मनोरंजन विश्वातील अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यामातून शोक व्यक्त करताना दिसत आहेत. या अभिनेत्यासोबत नेमकं काय झालं? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
कोण आहे हा अभिनेता?
या अमेरिकन अभिनेत्याचे नाव माल्कम-जमाल वॉर्नर असे आहे. त्याने 1980 च्या दशकातील “द कॉस्बी शो” या हिट शोमध्ये बिल कॉस्बी यांचा मुलगा थिओची भूमिका साकारली होती. सोमवारी वयाच्या 54 व्या वर्षी त्याचा बुडून मृ्त्यू झाला आहे, अशी माहिती एका कायदा अधिकाऱ्याने रॉयटर्सला दिली.
वाचा: बापरे बाप! असे पाय मी कुणाचेच पाहिले नव्हते; महागुरु कोणाविषयी बोलले
नेमकं काय झालं?
वॉर्नर आपल्या कुटुंबासह कोस्टा रिकामध्ये सुट्टीवर गेला होता. मध्य अमेरिकेतील या देशाच्या न्यायिक तपास विभागाने (OIJ) पुष्टी केली की, वॉर्नर नावाचा एक अमेरिकन नागरिक समुद्रातील तीव्र प्रवाहामुळे वाहून गेला. त्यानंतर त्याचा बुडून मृत्यू झाला. रेड क्रॉसच्या जीवरक्षकांनी त्याला घटनास्थळी मृत घोषित केले. वॉर्नर यांच्या प्रतिनिधींनी याबाबत तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
वॉर्नरला 2012 मध्ये “रीड बिटवीन द लाइन्स” या मालिकेसाठी NAACP कडून उत्कृष्ट कॉमेडी मालिकेतील अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. NAACP ने इन्स्टाग्रामवर दिवंगत अभिनेत्याचा फोटो आणि त्यासोबत एका कॅप्शनसह पोस्ट केली. “NAACP इमेज अवॉर्ड विजेता अभिनेता माल्कम-जमाल वॉर्नर यांना #RestinPower. तुमच्या प्रतिभेने आणि उत्साहाने अनेकांचे जीवन प्रभावित केले आणि तुमचा वारसा प्रेरणा देत राहील,” असे कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
वॉर्नर, यांचा जन्म 18 ऑगस्ट 1970 रोजी झाला. तो जर्सी सिटी, न्यू जर्सी येथे आपली आई पामेला यांच्यासह वाढला, जी नंतर त्यांच्या अभिनय व्यवस्थापक बनल्या. त्यांचे नाव नागरी हक्क नेते माल्कम एक्स आणि जाझ संगीतकार अहमद जमाल यांच्यावरून ठेवण्यात आले होते. त्याने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.