AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘द फॅमिली मॅन’ फेम अभिनेत्याच्या पत्नीला सहाव्यांदा कॅन्सर, सर्जरीमुळे बदलला चेहरा; संघर्ष सांगताना डोळ्यांत पाणी

'द फॅमिली मॅन' या वेब सीरिजमध्ये जेके तळपदेची भूमिका साकारलेला अभिनेता शारिब हाश्मी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पत्नीविषयी बोलताना भावूक झाला. शारिबच्या पत्नीला सहाव्यांदा कॅन्सरचं निदान झालं आहे.

'द फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याच्या पत्नीला सहाव्यांदा कॅन्सर, सर्जरीमुळे बदलला चेहरा; संघर्ष सांगताना डोळ्यांत पाणी
शारिब हाश्मी, नसरीन हाश्मीImage Credit source: Instagram
| Updated on: May 13, 2026 | 3:16 PM
Share

‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजमध्ये जेके तळपदेची भूमिका साकारून अभिनेता शारिब हाश्मी घराघरात पोहोचला. खऱ्या आयुष्यातही शारिब एक सच्चा फॅमिली मॅन आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो पत्नी नसरीन हाश्मीसोबत उपस्थित होता. या मुलाखतीत दोघं त्यांच्या आयुष्यातील प्रवासाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले. शारिबच्या पत्नीने पाच वेळा कॅन्सरशी झुंज दिली आहे. 2018 मध्ये तिला कॅन्सरचं निदान झालं होतं. तेव्हापासून ती या जीवघेण्या आजाराचा सामना अत्यंत धाडसाने करत आहे.

‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत नसरीनने सांगितलं की, जेव्हा शारिबला पहिल्यांदा कॅन्सरबद्दल समजलं, तेव्हा तो पूर्णपणे खचला होता. याबद्दल शारिब म्हणाला, “तिच्यावर आतापर्यंत पाच वेळा सर्जरी झाली आहे. पाच वेळा तिला कॅन्सर झाला आहे आणि आता सहाव्यांदाही ती या आजाराशी झुंज देत आहे. यावेळी कॅन्सर तिच्या पूर्ण शरीरात पसरला आहे. हा वेळसुद्धा निघून जाईल, सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. ज्याप्रकारे ती या आजाराचा सामना करत होती, त्याने आम्हा सर्वांना पूर्ण हिंमत मिळत होती. पाच वेळा कॅन्सर होऊनही तिने अत्यंत धाडसाने सगळ्या गोष्टी सहन केल्या आहेत. ती लढतेय.”

यावेळी नसरीननेही शारिबच्या पाठिंब्याचं कौतुक केलं. “तो माझ्यासोबत नेहमी उभा राहतो. शूटिंगचं शेड्युल कितीही व्यस्त असलं तरी त्यातून वेळ काढून तो रुग्णालयात पोहोचतो. रुग्णालयात दाखल होण्यापासून डिस्चार्ज मिळेपर्यंत तो त्याची बॅग घेऊन तिथेच बसतो. अजिबात हलत नाही. माझ्यासाठी तो तिथे असणंच खूप आहे. त्याच्या फक्त असण्यानेच मला शांती मिळते. आयुष्याच्या विविध टप्प्यांवर त्याने माझी खूप साथ दिली आहे”, अशा शब्दांत ती व्यक्त झाली.

शारिब हाश्मी आणि नसरीन यांनी 27 डिसेंबर 2003 रोजी लग्न केलं. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. किशोरवयात असताना या दोघांची पहिली भेट झाली होती आणि गेल्या 30 वर्षांहून अधिक काळापासून शारिब आणि नसरीन एकमेकांसोबत आहेत. शारिबने त्याच्या करिअरची सुरुवात शाहरुख खानसोबत केली होती. त्यानंतर ‘फिल्मीस्तान’ आणि ‘द फॅमिली मॅन’ यांसारख्या वेब सीरिजमुळे त्याला लोकप्रियता मिळाली.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...