‘मी त्याच्यासाठी फक्त एक तिकिट होती, कारण…’, दुसरं लग्न अपयशी ठरल्यानंतर अभिनेत्रीकडून खंत व्यक्त

पहिलं प्रेमविवाह केल्यानंतर अभिनेत्रीने सोसल्या यातना, दुसरं लग्न केलं कुटुंबियांच्या इच्छेने... पण प्रसिद्ध अभिनेत्रीला नाही मिळालं आनंदी वैवाहिक आयुष्य..., खुद्द अभिनेत्रीने केला तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा... घरगुती हिंसाचाराचे देखील अभिनेत्री दुरऱ्या पतीवर केले आरोप...

मी त्याच्यासाठी फक्त एक तिकिट होती, कारण..., दुसरं लग्न अपयशी ठरल्यानंतर अभिनेत्रीकडून खंत व्यक्त
| Updated on: Oct 30, 2023 | 2:49 PM

मुंबई : 30 ऑक्टोबर 2023 : झगमगत्या विश्वातील अभिनेत्री त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. अनेक अभिनेत्रींनी अभिनय क्षेत्रात येवून स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं, पण त्यांनी खासगी आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला. सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे, तिने दोनवेळा लग्न केलं. पण अभिनेत्रीला दोन्ही लग्नात अपयश मिळालं. अभिनेत्रीने पहिलं लग्न प्रियकरासोबत केलं. नातं फार टिकलं नसल्यामुळे अभिनेत्री कुटुंबियांच्या इच्छेने दुसरं लग्न केलं. पण दुसऱ्या लग्नात देखील अभिनेत्रीला यश मिळालं नाही. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून टीव्ही अभिनेत्री प्रिया बतिथा आहे.

प्रिया बतिथा कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. प्रिया हिने २००९ मध्ये प्रियकर जतिन शाह याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांचा २०११ मध्ये घटस्फोट झाला. पहिलं लग्न अपयशी ठरल्यानंतर अभिनेत्रीने दुसरं लग्न कंवलजीत सलूजा याच्यासोबत केलं. पण अभिनेत्रीचं दुसरं लग्न देखील टिकलं नाही.

खासगी आयुष्याबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘जेव्हा माझं लग्न जतिन याच्यासोबत झालं तेव्हा मी तरुण होती. पण आमचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही. नातं टिकवण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न केलं. पण आम्हाला दोघांना एकत्र राहाणं शक्य नव्हतं. म्हणून मी स्वतःला दुसरी संधी दिली आणि कुटुंबियांच्या इच्छेने लग्न केलं…

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘दुसऱ्या लग्नानंतर सर्वकाही ठिक होईल असं मला वाटलं… पण मी जे स्वप्न पाहिले होते, तसं काहीही झालं नाही… प्रेमविवाहावरुन विश्वास उठल्यामुळे मी कुटुंबियांच्या इच्छेने लग्न केलं. दुसऱ्या लग्नानंतर मी पती आणि सासरच्या मंडळींसोबत रायपूर याठिकाणी राहात होती. पण मला कळलं होतं पतीला मुंबईत यायचं होतं. मी दुसऱ्या पतीसाठी फक्त आणि फक्त मुंबई शहराचा तिकिट होती…’ असा खुलासा अभिनेत्रीने केला.

रिपोर्टनुसार, प्रिया हिने दुसरा पती कंवलजीत याच्यावर घरगुती हिंसाचाराचे देखील आरोप केले होते. एवढंच नाही तर अभिनेत्रीने दुसऱ्या पती विरोधात ओशिवारा पोलीस स्थानकात तक्रार देखील दाखल केली. प्रिया हिचं दुसरं लग्न देखील जास्त काळ टिकलं नाही. अखेर अभिनेत्रीचा दुसरा घटस्फोट २०१७ मध्ये झाला…