AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिद्धार्थ-कियाराच्या जोडीवर अदा शर्माची कमेंट चर्चेत; म्हणाली ‘दोघं निब्बा-निब्बी’

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या जोडीला 'द केरळ स्टोरी' फेम अभिनेत्री अदा शर्माने 'निब्बा-निब्बी' असं म्हटलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने ही कमेंट केली आहे. यामुळे अदा शर्माच्या या मुलाखतीची चांगलीच चर्चा होत आहे.

सिद्धार्थ-कियाराच्या जोडीवर अदा शर्माची कमेंट चर्चेत; म्हणाली 'दोघं निब्बा-निब्बी'
Adah Sharma and Siddharth KiaraImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 22, 2023 | 12:04 PM
Share

मुंबई | 22 सप्टेंबर 2023 : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या जोडीवर चाहत्यांकडून भरभरून प्रेमाचा वर्षाव होतो. सिद्धार्थ आणि कियाराला एकत्र पाहिल्यानंतर चाहतेसुद्धा खुश होतात. नुकतेच हे दोघं अंबानी कुटुंबीयांच्या घरी गणपती दर्शनासाठी पोहोचले होते. यावेळीही दोघांच्या केमिस्ट्रीने चाहत्यांची मन जिंकली होती. अशातच एका अभिनेत्रीने सिद्धार्थ आणि कियाराला चक्क ‘निब्बा निब्बी’ असं म्हटलंय. ही अभिनेत्री ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अदा शर्मा आहे. अदा शर्माने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सिद्धार्थ आणि कियाराला निब्बा-निब्बी असं म्हटलंय. त्यामुळे तिच्या या मुलाखती मुलाखतीची जोरदार चर्चा होत आहे.

अदा शर्मा ‘डिटॉक्स’ या शोमध्ये पोहोचली होती. यावेळी तिने फिल्म इंडस्ट्री आणि खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे भाष्य केलं. या मुलाखतीत अदा शर्माला बॉलिवूड इंडस्ट्रीतील निब्बा-निब्बीच्या जोडीविषयी प्रश्न विचारला गेला. त्यावर तिने सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचं नाव घेतलं. मात्र या दोघांचं नाव घेताना तिने निब्बा आणि निब्बीचा अर्थ वेगळ्या पद्धतीने घेत असल्याचं स्पष्ट केलं.

View this post on Instagram

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

या मुलाखतीत अदा शर्माला हॅशटॅग निब्बा-निब्बीवर प्रतिक्रिया देण्यास सांगितलं. त्यावर आधी ती त्याचा अर्थ सांगते. निब्बा निब्बी म्हणजे लवर पीपल असं ती म्हणते. त्यावर प्रश्न विचारणारी व्यक्ती अदा शर्माला म्हणते की, “तू तर गेमच बदलून टाकलंस. तुला त्या शब्दाचा अर्थ नाही तर त्या जागी कोणता तरी व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे.” तेव्हा ती सिद्धार्थ आणि कियाराचं नाव घेते.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ही फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी आहे. शेरशहा या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमधील जवळीक वाढली. त्यानंतर यावर्षीच दोघांनी लग्न केलं. तर दुसरीकडे अदा शर्मा ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटामुळे चर्चेत आली. यामधील तिच्या दमदार अभिनयाचा प्रेक्षक आणि समीक्षकांकडून खूप कौतुक झालं. याशिवाय अदा शर्मा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ क्षणार्धात व्हायरल होतात. अदा शर्माने विद्युत जामवालसोबत कमांडो या चित्रपटातही काम केलं होतं.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना